तुमच्यापैकी अनेक जण रोज कार, बाईक किंवा इतर वाहनांनी प्रवास करीत असतील. प्रवासादरम्यान रस्त्याच्या कडेला एका बोर्डवर फ्लायओव्हर किंवा ओव्हरब्रिज असे लिहिलेले आपण अनेकदा पाहिले असेल. वाहतूक सुरळीत करण्यासाठी देशभरात असे फ्लायओव्हर किंवा ओव्हरब्रिज बांधले गेले आहेत. त्यांच्या मदतीने तुम्हाला वाहनातून कोणत्याही अडथळ्याशिवाय वेगाने प्रवास करता येतो. या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतीलच. पण, तुम्हाला फ्लायओव्हर आणि ओव्हरब्रिज यामध्ये नेमका काय फरक असतो हे माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊ यातील फरक …

फ्लायओव्हर आणि ओव्हरब्रिजमध्ये नेमका फरक काय?

बहुतेकांना फ्लायओव्हर आणि ओव्हरब्रिज यामधील फरक माहीत नाही. तुम्हीदेखील अशा लोकांपैकी एक असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. फ्लायओव्हर आणि ओव्हरब्रिज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बांधकामापासून ते इतर अनेक गोष्टींपर्यंत या दोघांमध्ये खूप फरक आहे.

फ्लायओव्हर कशाला म्हणतात?

फ्लायओव्हर अनेकदा अशा रस्त्यांवर बांधले जातात; ज्यावर आधीच मोठ्या प्रमाणात ‘ट्रॅफिक जाम’ची समस्या असते. हीच समस्या सोडवण्यासाठी संबंधित रस्त्यावर पिलर उभे करून फ्लायओव्हर बांधला जातो. या फ्लायओव्हरची लांबी त्या रस्त्यावरील वाहतूक आणि भौगोलिक स्थितीवरून लक्षात घेऊन ठरवली जाते. हे फ्लायओव्हर एक ते दोन किंवा ५ ते १० किलोमीटरपर्यंत लांब असू शकतात. बेंगळुरू येथील विश्वेश्वरय्या फ्लायओव्हर देशातील सर्वांत लांब फ्लायओव्हर म्हणून ओळखला जातो; जो ११.६ किमी लांबीचा आहे.

ओव्हरब्रिज म्हणजे काय?

ओव्हरब्रिजही अशा ठिकाणी बांधले जातात, जिथे रेल्वे लाईन आणि रस्ता एकमेकांना क्रॉस करणारा आहे. याचा अर्थ दोन्ही बाजूंच्या रस्त्यांना जोडण्यासाठी ओव्हरब्रिज बनवला जातो; ज्यामुळे ट्रेन कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकेल. त्याशिवाय पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडणे सुलभ होते. तसेच वाहनचालकांनाही दुसऱ्या बाजूला आरामात जाता येते. मुंबईत अनेक भागांत रेल्वे ट्रॅकवरून जाणारे असे ओव्हरब्रिज पाहायला मिळतात. त्यामुळे पूर्व, पश्चिम अशी वाहतूक सुरळीत होते. या ओव्हरब्रिजची लांबी फ्लायओव्हरपेक्षा कमी असून, खर्चही कमी असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • पब्लिक ब्रिज

काही ब्रिज हे पादचाऱ्यांना जा-ये करण्यासाठी बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पादचारी कोणत्याही धोक्याशिवाय आणि रहदारीच्या मार्गात अडथळा न आणता, सहजपणे रस्ता ओलांडू शकतात.