scorecardresearch

पार्किंगमधून वाहन चोरीला गेल्यास काय कराल? जाणून घ्या यासंबंधीचे नियम

तुमची प्रिय कार चोरीला गेली तर? काय कराल, जाणून घ्या नियम.

पार्किंगमधून वाहन चोरीला गेल्यास काय कराल? जाणून घ्या यासंबंधीचे नियम
पार्किंगमधून कार, बाइक चोरीला गेल्यास काय कराल? (Photo – pixabay)

एक घर, एक चारचाकी वाहन असे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्याचे अनेक वर्ष ते घालतात. मगं कुठेतरी ते स्वप्न पूर्ण होते. एक-एक पैसा जमवून चारचाकी वाहन खरेदी करतात. परंतु विचार करा तुमची प्रिय कार चोरीला गेली तर? आपल्या देशात दररोज कित्येक वाहनं चोरीला जातात.

जर तुम्ही एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केले आणि त्यादरम्यान तुम्ही हॉटेलच्या पार्किंग एरियामध्ये तुमची कार पार्क केली तर तुमची कार चोरीला जाण्याची शक्यता असते. पार्किंग परिसरात चोरटे आधीच हजर असतात आणि एखादे वाहन उभे करताच त्याचे कुलूप तोडून ते चोरी करतात, असे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? यासाठी देशात आधीपासूच यासंबंधीचे कायदे आहेत जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवितात. चला तर मग जाणून घेऊया की कार चोरीला गेल्यावर अशावेळी तुम्ही काय कराल?

(आणखी वाचा : Car Tips: अपघातानंतर वाहनाला आग लागल्यास ‘या’ गोष्टींमुळे वाचतील तुमचे प्राण; जाणून घ्या प्रवास करताना काय काळजी घ्यावी)

काय सांगतात कायदे ?

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, एखाद्या ग्राहकाने हॉटेल किंवा रेस्टॉरंटला भेट देऊन त्याच्या कारच्या चाव्या त्याच्या व्यवस्थापनाकडे दिल्यास, हॉटेल कारच्या सुरक्षेची काळजी घेईल. अशा परिस्थितीत गाडी चोरीला गेली किंवा तिचे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई हॉटेलकडून केली जाते. मात्र, चोरीच्या वेळी वाहनाची चावी व्यवस्थापनाकडे असावी, हे ध्यानात ठेवावे लागेल. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, हॉटेलच्या बाजूने पार्किंगची व्यवस्था असेल आणि त्याच पार्किंगमध्ये कारचे काही नुकसान किंवा चोरी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी हॉटेलची असेल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
  • हॉटेलच्या फ्री पार्किंग एरियामध्ये तुमचे वाहन उभे केले असले तरीही, वाहन चोरीला गेल्यास तुम्हाला संपूर्ण नुकसान भरपाई मिळेल. कार पार्किंग मोफत दिल्याचे कारण देत हॉटेलने पैसे देण्यास नकार दिल्यास, तसे करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नियमांनुसार हॉटेल्स ग्राहकांकडून रूम सर्व्हिस, जेवण, प्रवेश शुल्क अशा अनेक प्रकारे पैसे घेतात. अशा परिस्थितीत कार चोरीला गेल्यास हॉटेलला नुकसान भरपाई द्यावी लागेल.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 15:20 IST

संबंधित बातम्या