Sleeping During Study: अभ्यास करायला घेतला की झोप येते हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतला असेलच. लहान मुलं अनेकदा अभ्यास करता-करता पेंगायला लागतात. बऱ्याच वयस्कर मंडळींनाही ही सवय असते. रात्री वाचन केल्याने छान झोप लागते असेही म्हटले जाते. यावरुन झोप आणि वाचन यामध्ये काहीतरी संबंध आहे हे लक्षात येते. अभ्यास करताना पेंग येण्याची सवय वाईट असते. यावर वेळीच उपाय केले नाही तर त्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होऊ शकतो असे तज्ज्ञ सांगतात.

अभ्यास करताना किंवा पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यांवर दबाव येत असतो. अशा वेळी वाचलेली गोष्ट मेंदूमध्ये साठवली जात असते. ही क्रिया सतत घडत असल्यास डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. त्यानंतर थकल्याने मेंदूमध्ये माहिती साठवायची प्रक्रिया हळूहळू बंद होत जाते. त्यातून पुढे पेंग लागायला सुरुवात होते. जेव्हा आपण अभ्यास करत असतो, त्या वेळेस डोळे आणि मेंदू व्यतिरिक्त आपले संपूर्ण शरीर आराम मुद्रेमध्ये असते. शरीर रिलॅक्स मोडमध्ये असल्याने स्नायू देखील आराम मुद्रेमध्ये जातात. यामुळे झोप येऊ लागते. यामुळे अभ्यास करताना एका विशिष्ट स्थितीमध्ये न बसता ठराविक कालावधीनंतर शरीराची हालचाल करण्याचा सल्ला दिला जातो. प्रवासादरम्यानही अशा प्रकारे शरीर आराम अवस्थेमध्ये जाते, फक्त डोळे, मेंदू यांचे कार्य सुरु असते. त्यामुळे प्रवास करताना बहुतांश लोकांना सतत झोप येत असते.

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

आणखी वाचा – हवेत उडणारे मासे पाहिलेत का? एक्सप्रेस ट्रेनहुन जास्त वेगाने घेऊ शकतात हवेत झेप, पाण्यात येताच…

अभ्यास करताना झोप येऊ नये यासाठी काय करावे?

  • बेडवर अभ्यास करणे टाळावे. नेहमी टेबल-खुर्चीवर बसून अभ्यास करावा.
  • टेबल-खुर्चीची सोय नसेल, तर भिंतीला टेकून ताठ बसण्याचा प्रयत्न करावा.
  • ज्या जागेमध्ये अभ्यास करायला बसणार आहात, ती जागा प्रकाशमय असावी.
  • खिडकीच्या शेजारी अभ्यास करणे अधिक फायदेशीर ठरेल. खिडकीतून येणाऱ्या हवेमुळे तरतरी राहील.
  • अभ्यास करण्याआधी पोटभर जेऊ नये.