आपण अनेकदा कारने प्रवास करतो. या प्रवासादरम्यान आपल्याला कारच्या अनेक फीचर्सबाबत नव्याने माहिती मिळते किंवा कारमध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी नेमक्या तशा का आहेत याबाबत आपल्याला कुतूहल वाटते, त्याबाबतचे बरेच प्रश्न तुम्हालाही पडले असतील. असाच एक सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे कारच्या मागील काचेवर रेषा का असतात. त्या रेषांचा काय उपयोग असतो जाणून घ्या.

कारच्या मागील काचेवर असणाऱ्या या रेषांना डिफॉगर लाइन म्हटले जाते. या रेषा धातूच्या बनलेल्या असतात. त्या डिझाईनचा भाग नसुन विशिष्ट कारणासाठी त्या मागील काचेवर बसवल्या जातात. काय आहे ते कारण जाणून घ्या.

आणखी वाचा: ‘यात्रीगण कृपया ध्यान दे…’ रेल्वे स्थानकांवर ऐकू येणाऱ्या आवाजामागील चेहरा; जाणून घ्या कशी झाली निवड

गाडीच्या मागील काचेवर रेषा का असतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडीच्या मागच्या काचेवर असणाऱ्या या रेषा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात प्रवासादरम्यान अडचणी येऊ नयेत यासाठी मदत करतात. पावसाळ्यात पावसाचे पाणी किंवा थंडीतील धुके काचेवर जमा होऊ नये यासाठी या रेषा बसवल्या जातात. या डिफॉगर लाईन्सचा वापर करण्यासाठी ड्रायवरजवळ एक स्विच देखील उपलब्ध असते.