scorecardresearch

World Smallest Railway Station : ‘हे’ आहे जगातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन: येथील रुळावरून धावतात फक्त ट्रेनचे दोनचं डब्बे

या रेल्वे स्थानकातील प्रवासासाठी फक्त दोन ते तीन मिनिटं लागतात.

world smallest railway station angels flight only two coach runs on the track
जगातील सर्वात छोटं रेल्वे स्टेशन (Photo Credit – angelsflight.org, FB Official)

आत्तापर्यंत आपण जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशनची माहिती वाचली असेल, सर्वात मोठं छोटं नाव असलेल्या रेल्वे स्टेशनबद्दल जाणून घेतलं असेल, पण आज आपण जगातील सर्वात छोट्या रेल्वे स्टेशनबद्दल जाणून घेणार आहोत ज्या रेल्वे स्टेशनच्या रुळावरून ट्रेनचे फक्त दोनचं डब्बे धावतात.

तुम्ही ट्रेनमध्ये एकदा बसल्यानंतर पुढील प्रवास फक्त एक ते दोन मिनिटांचा किंवा त्याहून कमी वेळेचा पूर्ण झाल्याचं कधी अनुभवलं का? नाही ना.. पण जगात असं एक रेल्वे स्टेशन आहे, ज्याठिकाणाहून धावणाऱ्या ट्रेनमधील प्रवास केवळ दोन ते तीन मिनिटांचा असतो. कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिसमध्ये एका ट्रेनबाबत असा दावा केला आहे की, ही जगातील सर्वात लहान रेल्वे आहे. ही ट्रेन हिल स्ट्रीट आणि ग्रँड एव्हेन्यू दरम्यान बंकर हिलवर धावते. या छोट्या ट्रेनमुळे येथील लोकांच्या जीवनात मात्र मोठे बदल झाले आहेत.

हे जगातील सर्वात लहान रेल्वे स्थानक

लोकांसाठी हे रेल्वे स्थानक एक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. एंजल्स फ्लाइट ही 2 फूट 6 इंच (762 मिमी) नॅरो गेज फ्युनिक्युलर रेल्वे आहे. कॅलिफोर्नियाच्या डाउनटाउन लॉस एंजेलिसच्या बंकर हिल जिल्ह्यात स्थित या रेल्वेचे ऑलिव्हेट आणि सिनाई म्हणून ओळखले जाणारे दोन फ्युनिक्युलर कंपार्टमेंट आहेत. हे दोन्ही कंपार्टमेंट 298 फूट (91 मीटर) लांबीच्या झुकलेल्या रेल्वे रुळावरून एक शेअरेबल केबलवर विरुद्ध दिशेने धावतात.

1901 ते 1969 पर्यंत जुनी एंजल्स फ्लाइट ही हिल स्ट्रीट आणि ऑलिव्ह स्ट्रीटला जोडलेली होती, नंतर पुनर्विकासाच्या उद्देशाने ती बंद करण्यात आली. नंतर पुन्हा काही वर्षांनंतर 1996 मध्ये हिल स्ट्रीट आणि कॅलिफोर्निया प्लाझा यांना जोडणारी दुसरी एंजल्स फ्लाइट सुरू करण्यात आली.

2001 मध्ये एका भीषण अपघातामुळे ही फन ट्रेन पुन्हा बंद करण्यात आली होती. यात एक प्रवासी ठार झाला होता आणि अनेक जखमी झाले होते. यानंतर पुन्हा नऊ वर्षांनंतर रेल्वेने 2010 मध्ये एंजल्स फ्लाइट पुन्हा सुरू केली, परंतु लगेच काही काळासाठी पुन्हा बंद करण्यात आली.

2013 मध्ये रेल्वे रुळावरून घसरल्याच्या घटनेमुळे हे रेल्वे स्टेशनचं बंद करण्यात आले. या अपघातांच्या सुरु असलेल्या घटनांच्या तपासादरम्यान असे आढळून आले की, ट्रेनच्या डिझाइन आणि ऑपरेशनमध्ये काही गंभीर सुरक्षा समस्या आहेत. यानंतर या समस्यांवर तोडगा काढत जगातील सर्वात लहान रेल्वे अखेर 2017 मध्ये पुन्हा सुरु झाले. यात हायटेक यंत्रणेसह प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली. तेव्हापासून एलएमधील रेल्वे हे शहरातील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे आणि लोकांना येथे प्रवासाचा अनुभव घ्यायचा आहे.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 19:06 IST