20 September 2020

News Flash

पाच वर्षात नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ५२ टक्के वाढ, जाणून घ्या…

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नरेंद्र मोदी यांचे १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत.

मागच्या पाच वर्षात २०१४ ते २०१९ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्के वाढ झाली आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फिक्स डिपॉझिटच्या स्वरुपात जास्त चल संपत्ती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नरेंद्र मोदी यांचे १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत.

प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण संपत्ती २.५१ कोटी रुपये आहे. चल संपत्ती १.४१ कोटी रुपये आणि अचल संपत्ती १.१० कोटी रुपये आहे. २०१४ च्या तुलनेत मोदींच्या चल संपत्तीमध्ये ११४.१५ टक्के वाढ झाली आहे. २०१४ साली मोदींनी पहिल्यांदा वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. २०१४ साली मोदींकडे ६५.९१ लाख चल संपत्ती होती. सरकारी वेतन आणि बचतीवर मिळणारे व्याज हे नरेंद्र मोदींचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे.

आपल्या विरोधात कुठलाही गुन्हेगारी आरोप नसल्याचे पंतप्रधान मोदींनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली संपत्ती तीन प्रकारात मोडते. चल, अचल आणि देणी असे वर्गीकरण केले जाते. ३१ मार्च २०१९ रोजी मोदींकडे ३८,७५० रुपये रोकडमध्ये उपलब्ध होते. मोदी यांच्याकडे ४,१४३ रुपये बँक बॅलन्स असून १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत. २०१४ साली मोदींकडे ३२ हजार ७०० रुपये रोकडमध्ये उपलब्ध होते. २६.०५ लाख रुपये बँक बॅलन्स होता आणि फिक्स डिपॉझिटमध्ये ३२.४८ लाख रुपये होते.

२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नरेंद्र मोदींनी २० हजार रुपये बाँडमध्ये गुंतवले आहेत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात ७.६१ लाख रुपये आणि लाईफ इन्शुरन्समध्ये १.९० लाख रुपये आहेत.

नरेंद्र मोदींकडे ४५ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठया असून ३१ मार्च २०१९ च्या व्हॅल्युएशननुसार त्याची किंमत १ लाख १३ हजार ८०० रुपये आहे. २०१४ साली त्या अंगठयांची किंमत १.३५ लाख रुपये होती. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर कुठलेही कर्ज नाही. दिल्ली विद्यापीठातून मोदींनी १९७८ साली पदवी घेतली त्यानंतर १९८३ साली अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 5:32 pm

Web Title: know about narendra modis assets
Next Stories
1 काँग्रेसला मत दिल्याने ममता बॅनर्जींच्या समर्थकाने पत्नीला पाजलं अॅसिड
2 INS विक्रमादित्यवर आगीत नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू, भारताची सर्वात मोठी युद्धनौका
3 पत्नीच्या भीतीने रघुरामांचं ‘न’राजकारण
Just Now!
X