कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी झालेल्या मतमोजणीत २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळत काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे ‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखलं जाणार एक महत्वाचं राज्य भाजपाने गमावलं आहे. तब्बल १० वर्षांनी काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता बहाल केली आहे. अशातच मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी आज ( १४ मे ) काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. याबैठकीत आमदारांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं हा निर्णय सोपवण्यात येईल, असं सांगितलं जात आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार यांच्यासह अन्य दोन नेते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.

हेही वाचा : २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या त्या ‘१७’ आमदारांचे काय झाले? किती जिंकले, हरले?

मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते दीपक बाबरिया, नेते जितेंद्र सिंह यांचा समावेश आहे. हे तिन्ही नेते आजच्या विधिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेसच्या आमदारांचं मत जाणून घेणार आहेत.

कर्नाटकात काँग्रेसला १३५ जागा मिळाल्या असून, २०१८ पेक्षा ५६ जागा अधिक जिंकल्या आहेत. तसेच, काँग्रेसला ४२.९ टक्के मतदान मिळालं आहे. यापूर्वी १९९९ साली ४०.८४ टक्के मते मिळवत काँग्रेसने १३२ जागा जिंकल्या होत्या. तर, १९९८ साली ४३.७६ टक्के मते मिळवत तब्बल १७८ जागा काँग्रेसला मिळालेल्या.

हेही वाचा : कर्नाटकात काँग्रेसच्या विजयामागील रणनीतीकार सुनिल कनुगोलू कोण आहेत? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने ३६ टक्के मिळवत ६६ जागा जिंकल्या आहेत. तसेच, जनता दलाला ( धर्मनिपेक्षक ) केवळ १३.३ टक्के मते मिळाली आहे. तर, १९ जागांवर जनता दलाला समाधान मानावं लागलं आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिलं आहे.