Lok Sabha ELection Result 2024 : १८ व्या लोकसभेचा निकाल आज लागत आहे. संपूर्ण देशाला निवडणुकांच्या निकालाचे वेध लागले होते. त्याप्रमाणे आज निकाल समोर येत आहेत. दरम्यान १ जून रोजी सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर अनेक एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. त्यापूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाला ३५० पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र त्यांचा अंदाज सध्यातरी साफ चुकीचा ठरताना दिसत आहे. भाजपाला ज्या उत्तर प्रदेशपासून सर्वाधिक आशा होती, त्या राज्यात त्यांना अपेक्षा एवढ्या जागा मिळताना दिसत नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने ३५ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

लोकसभा निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

प्रशांत किशोर यांनी कोणता अंदाज वर्तविला?

२०१९ पेक्षाही भाजपा यंदा अधिक चांगल्या पद्धतीने बहुमत मिळवेल, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तविला होता. २०१९ पेक्षाही थोड्या फरकाने भाजपाच्या जागा वाढलेल्या असतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले होता. “माझ्या विश्लेषणानुसार भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू शकते. पश्चिम आणि उत्तर भारतात जागांच्या आकडेवारीत फार मोठे बदल दिसण्याची शक्यता कमी वाटते. मात्र पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाला चांगला पाठिंबा मिळत असून याठिकाणी त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे”, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत दिली होती.

निकालांबाबत शरद पवार नितीश कुमारांशी नव्हे, ‘या’ दोन नेत्यांशी बोलले; स्वत: माहिती देताना म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने गतकाळात तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूमध्ये पक्षाचा विस्तार करण्यात चांगली मेहनत घेतली. याठिकाणच्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले होते.