मनसेने अमित ठाकरे यांना माहीममधून उमदेवारी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, आज उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करत दादर-माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

दादर-माहीम मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत आज उद्धव ठाकरे त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर केली. या बैठकीनंतर महेश सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात माहिती दिली. कितीही जणांचं आव्हान असलं, तरी जनतेला रात्री अपरात्री भेटणारा उमेदवार भेटला आहे. त्यामुळे आम्हाला समोर कुणाचं आव्हान आहे, असं वाटत नाही. बाळासाहेबांची शिवसेना जशी काम करत होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे. त्याच पद्धतीने काम होणार आहे. शेवटी विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच होणार आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा – Amit Thackeray on Aaditya Thackeray : अर्धा समुद्र भावाच्या मतदारसंघात, स्वच्छ करणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं लागलीच उत्तर, म्हणाले…

उमदेवारीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की माहीममधून जे उमेदवार इच्छूक होते, त्यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलं होतं. या बैठकीत त्यांनी सर्वांसमोर माझीउमेदवारी जाहीर केली. तसेच माहीम-दादरवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याची निर्देश दिले.

हेही वाचा – लोकसभेला मोदींना पाठिंबा देणाऱ्या मनसेला भाजपा विधानसभा निवडणुकीत साथ देणार? अमित ठाकरे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहीमध्ये तिरंगी लढत

महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता माहीमध्ये तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यापूर्वी मनसेने राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी दिली आहे. तर एकनात शिंदे यांच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे माहीममध्ये चुरशीची लढत होणार आहे.