Nanadgaon : नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्यांच्याभोवती फिरणारं राजकारण आणि भुजबळांशी वैर, यावेळी कांदे गड राखणार?

सुहास कांदे यांनी २०१९ मध्ये पंकज भुजबळ यांचा पराभव करत नांदगावच्या विजयावर आपलं नाव कोरलं.

Suhas Kande MLA From Nandgaon
सुहास कांदे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक जिंकली (फोटो-लोकसत्ता)

Nanadgaon : नांदगाव नावाची महाराष्ट्रात ७२ गावं आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या मतदारसंघाचं महत्त्व वेगळं आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे ठिकाण आहे. तसंच हा मतदारसंघ आधी पंकज भुजबळांचा आणि आता सुहास कांदेंचा आहे. नांदगाव हे शहर जिल्ह्याचं मुख्यालय नाशिक शहरापासून जवळपास १०० किमी अंतरावर् आहे. नांदगाव मध्य रेल्वेचं स्थानक असून मुंबई -भुसावळ मार्गावर मनमाड नंतरचं स्थानक आहे. नांदगाव मधील एकवीरादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवे कालीन असून ते ३५० वर्ष जुने आहे.सुहास कांदे ( Nanadgaon) मराठी राजकारणी आहेत. हे नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले आहेत. आता आपला गड राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

२००९ आणि २०१४ ची स्थिती काय होती?

२००९ मध्ये नांदगाव (Nanadgaon ) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ आमदार झाले. तर २०१४ मध्ये त्यांनी सुहास कांदेंचा ( Suhas Kande ) १८ हजार ४३६ मतांनी पराभव केला आणि ते या मतदारसंघाचे आमदार झाले. सलग दोनवेळा आमदार होण्याचा रेकॉर्ड पंकज भुजबळ यांनी त्यांच्या नावावर नोंदवला आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Loksatta karan rajkaran Assembly Election 2024 Controversy between Chhagan Bhujbal and Suhas Kande MVA print politics news
कारण राजकारण: कांदे-भुजबळ वादामुळे मविआला लाभ
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Dombivali Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय

नांदगाव मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग

नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव याच मतदारसंघातून केला. त्यावेळी पंकज भुजबळ यांना ९६ हजार २९२ मतं मिळाली तर संजय पवार यांना ७४ हजार ९२३ मतं मिळाली होती. २०१४ मध्ये ही लढत पुन्हा एकदा पंकज भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी झाली. सुहास कांदेंना ५० हजार ८२७ मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना ६९ हजार २६३ मतं मिळाली. सुहास कांदेंचा पराभव झाला. या पुढच्या निवडणुकीत म्हणजेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदेंना ८५ हजार २७५ मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना ७१ हजार ३८६ मतं मिळाली.

२०१९ ला काय घडलं?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नांदगावातून (Nanadgaon) सुहास कांदे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर २०२२ ला एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं त्या बंडात सुहास कांदेही सहभागी झाले. यामुळे घडलं असं की एकमेकांशी कट्टर वैर असलेले दोन नेते पुन्हा एकाच सरकारमध्ये आले. ते दोन नेते होते सुहास कांदे आणि दुसरे आहेत छगन भुजबळ. २०१९ च्या निवडणुकीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला. २००९ आणि २०१४ चा वचपा सुहास कांदेंनी ( Suhas Kande ) काढल्याचं या निवडणुकीत दिसून आलं.

हे पण वाचा- कारण राजकारण: कांदे-भुजबळ वादामुळे मविआला लाभ

सुहास कांदेंची राजकीय पार्श्वभूमी

या मतदारसंघातून आमदार झालेले सुहास कांदे शिवसेनेत असले तरीही ते याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. एकेकाळी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र नंतर जेव्हा त्यांचा दबदबा वाढला तेव्हा छगन भुजबळ आणि सुहास कांदे ( Suhas Kande ) यांच्यात वैर निर्माण झालं.

छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातलं वैर लपलेलं नाही

२०२२ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केले. त्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मत बाद केल्यानंतर आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केला नसल्याचा आरोप सुहास कांदे ( Suhas Kande ) यांनी याचिकेत केला होता त्यामुळे ते चर्चेत आले होते. तसंच छगन भुजबळांशी त्यांचं असलेलं वैर हे लपून राहिलेलं नाही.

नांदगावात सुहास कांदेंचं वर्चस्व

१० मे २०२३ ला सुहास कांदेंनी नांदगाव (Nanadgaon) बाजार समितीच्या निवडणुकीत पंधरा जागांवर विजय मिळवत बाजार समितीची सत्ताही राखली आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. नांदगाव आणि त्या मतदारसंघातलं राजकारण हे सुहास कांदे आणि पंकज भुजबळ यांच्याभोवती फिरत आलं आहे. सध्या या मतदारसंघात सुहास कांदेंचं वर्चस्व आहे यात शंका नाही. आता प्रश्न आहे तो या निवडणुकीचा येत्या निवडणुकीत ते गड राखतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suhas kande mla of nandgaon and politics around him know about nandgaon scj

First published on: 17-09-2024 at 18:48 IST

संबंधित बातम्या