संदीप नलावडे
गेल्या दोन दशकांमध्ये परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. २०२१ पासून १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांना पसंती दिली. त्यातही सर्वाधिक विद्यार्थी उत्तर अमेरिकेतील कॅनडाला पसंती देत आहेत. चार महिन्यांपूर्वी शीख दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारत-कॅनडा राजनैतिक संबंध बिघडले असले तरी कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी सर्वाधिक प्रमाणात का जात आहेत याचा आढावा…

कॅनडामध्ये किती भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी जात आहेत?

गेल्या पाच वर्षांत शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडालाच पसंती दिली आहे. पाचपैकी चार वर्षे कॅनडा भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये कॅनडामध्ये ३,१९,१३० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी उत्तर अमेरिकेतील या राष्ट्रात गेले आहेत. पूर्वी अमेरिका, युरोपीय राष्ट्रे, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ अधिक होता. मात्र आता विद्यार्थ्यांचा ओघ कॅनडाकडे वाढला आहे. पूर्वी कॅनडामधील शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वाधिक चिनी विद्यार्थी प्रवेश घेत असत. मात्र २०१८ मध्ये कॅनडातील चिनी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली. २०१५ मध्ये ४८,७६५ भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत होते. हीच संख्या २०१९ मध्ये चौपटीने वाढून २,१९,८५५ झाली, जी कॅनडाच्या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा ३४ टक्के होती. यंदाच्या वर्षी कॅनडात शिक्षण घेणारे सर्वाधिक परदेशी विद्यार्थी भारतीय आहेत. २०१८ पासून गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ८६ टक्क्यांनी वाढली आहे.

Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
jee main result
अरे व्वा! जेईई मेन परीक्षेत तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० गुण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश!
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

आणखी वाचा-विश्लेषण: नौदलातील हुद्द्यांचे भारतीय संस्कृतीनुसार नामकरण शक्य होईल?

कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाण्याची कारणे काय?

गेल्या काही वर्षांपासून कॅनडाच्या विकासदरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे शैक्षणिक धोरण कॅनडा सरकारकडून राबवले जात आहेत. अन्य पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणेच कॅनडा उच्च दर्जाची शिक्षण प्रणाली आणि प्रतिष्ठित विद्यापीठांसाठी प्रसिद्ध आहे. व्यापक जागतिक दृष्टिकोन मिळविण्याच्या आणि करिअरच्या शक्यता वाढवण्याच्या आश्वासनांमुळे विद्यार्थी आकर्षित होत आहेत. भारतातील तीव्र स्पर्धा आणि मर्यादित संधी हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय शिक्षण व्यवस्था प्रचंड स्पर्धात्मक आहे आणि प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. त्यातच कॅनडामध्ये विद्यार्थीस्नेही शैक्षणिक धोरणांमुळे भारतीय विद्यार्थी कॅनडाला पसंती देत आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांमुळे कॅनडाला आर्थिक फायदा काय?

कॅनडामधील महाविद्यालयांमध्ये ७० ते ७५ टक्के विद्यार्थी भारतीय आहेत. भारतीय विद्यार्थ्यांकडून मिळणारे शैक्षणिक शुल्क एकूण वार्षिक शुल्काच्या ५५ ते ६० टक्के आहे. कॅनेडियन नागरिकत्व असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप कमी शुल्क आकारले जाते आणि बहुतेक शुल्क कॅनडाच्या सरकारकडून अनुदानित केले जाते. दरवर्षी कॅनडामध्ये सुमारे दोन लाख भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. त्याच्या शुल्कापोटी ८० हजार कोटींपेक्षा जास्त रुपये कॅनडाला मिळतात. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांमुळे कॅनडाला आर्थिक फायदा होत आहे. कॅनडामध्ये पदवीपूर्व शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थी ३६,१०० डॉलर प्रतिवर्ष मोजतात, तर पदवी शिक्षणासाठी २१,१०० डॉलर प्रतिवर्ष मोजावे लागतात. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना राहण्याचा खर्च सुमारे १५,००० डॉलर दरवर्षी येतो.

आणखी वाचा-महापरिनिर्वाण दिन: बाबासाहेबांनी मार्क्सवादी तत्त्वज्ञानापेक्षा गौतम बुद्धांचा मार्ग श्रेष्ठ का मानला?

कॅनडा-भारत यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येवर काय परिणाम?

शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध तणावपूर्ण बनले. भारत सरकारने, कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांवर हल्ल्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवून कॅनडामधील भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. कॅनडामधील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. उभय देशांतील तणावाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला. कॅनडातील विद्यापीठांत यापूर्वी प्रवेश मिळालेल्या काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करून अन्य देशांत शिक्षण प्रवेश घेतला. मात्र उभय देशांमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला असला तरी विद्यार्थ्यांच्या हितावर त्याचा परिणाम होणार नाही, असे कॅनडा सरकारकडून सांगण्यात आले. मात्र या तणावाचा परिणाम कॅनडा व्हिसा प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे कॅनडामध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते.