गेल्या वर्षी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक आठ वर्षीय मुलगा दलाई लामा यांच्यासमोर नतमस्तक झाला, तेव्हा त्यांनी त्या मुलाचे चुंबन घेतले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आणि दलाई लामांचे असे वागणे समर्थनीय नाही, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. हा व्हिडीओ व्हायरल होताच चीनला जणू संधीच मिळाली आणि त्यांनी दलाई लामा यांची प्रतिमा कलंकित करण्यासाठी त्यांच्या विरोधात ‘स्मीअर’ मोहीम सुरू केली. ही मोहीम नेमकी काय आहे? त्या व्हिडिओमागील नेमके सत्य काय होते? हे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालात नक्की काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊ या.

चीनची ‘स्मीअर’ मोहीम

चिनी कम्युनिस्ट पक्षाने (सीसीपी) अलीकडेच समाजमाध्यमांवर तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्याविरोधात एक मोहीम सुरू केली आहे. चीनमुळे दलाई लामा यांना तिबेटमधून पलायन करावे लागले होते, असे कॉर्नेल विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक मॅग्नस फिस्केजो यांनी ‘द डिप्लोमॅट’ या अहवालात लिहिले आहे. तेव्हापासून म्हणजे १९५९ पासून दलाई लामा भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. दलाई लामांच्या विरोधात सुरू असलेली ही मोहीम नवीन नाही. कारण- चीन १९५९ पासून शक्य त्या प्रत्येक माध्यमात त्यांची बदनामी करीत आला आहे. दलाई लामा यांची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा चीनचा प्रयत्न राहिला आहे.

Elon Musk China Visit
‘स्पेसएक्स’च्या महिला कर्मचाऱ्यांशी लैंगिक संबंध, मुलं जन्माला घालण्यास दबाव; एलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप
MP Chirag Paswan Leaked Video
कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या लीक क्लिपमुळे खळबळ, मोदींवरही होतेय टीका! Video मध्ये काय व कधी घडलं?
elon musk apple reuters
“…तर आम्ही iphone सह Apple च्या सर्व उत्पादनांवर बंदी घालू”, एलॉन मस्क यांची धमकी
lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
A record of winning more than 400 seats in the Lok Sabha In the name of Rajiv Gandhi himself
‘४०० पार’नंतरची कारकीर्द…
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”
Uddhav Thackeray Party symbol lok sabha Election 2024
‘असली’ कोण; ‘नकली’ कोण…!
Putin, Putin news, Russia,
विश्लेषण : रशियात एकामागून एक लष्करी सेनापतींना पुतिन बडतर्फ का करत आहेत? भ्रष्टाचाराबद्दल की आणखी काही कारण?
दलाई लामा यांची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा चीनचा प्रयत्न राहिला आहे. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : करोना विषाणू आजही अस्तित्वात; मग त्याचा धोका कमी होऊन संक्रमितांची संख्या कशी घटली?

पण, सीसीपीने दलाई लामा यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मोहिमेला नवीन स्वरूप दिले. मॅग्नस फिस्केजो यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, एका कार्यक्रमात दलाई लामा यांच्या एका भारतीय अनुयायाने आपल्या आठ वर्षांच्या मुलाला दलाई लामा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आणले. २८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप अपलोड करण्यात आली. अलीकडच्या काही वर्षांत, चिनी प्रचार एजन्सी चिनी प्लॅटफॉर्मऐवजी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म वापरून केवळ देशांतर्गत नाही, तर जागतिक स्तरावर समाजमाध्यमे हाताळण्याचे त्यांचे प्रयत्न वाढवत आहे, असेही अहवालात सांगण्यात आले.

जेव्हा प्रचार अधिकाऱ्यांना फेब्रुवारीचे दलाई लामा यांचे फुटेज सापडले तेव्हा प्रचार एजन्सीला टीकेसाठी ठोस मुद्दा मिळाला. दलाई लामा यांनी आठ वर्षांच्या मुलाचे चुंबन घेतानाच्या कृतीतून नकारात्मक भाव स्पष्टपणे प्रतीत व्हावा यासाठी मूळ ध्वनिचित्रफितीशी छेडछाड करण्यात आली आणि दलाई लामा यांनी आपली जीभ मुलाच्या जिभेला लावली, असे भासवणारी प्रतिमा तयार करण्यात आली असे, ‘द डिप्लोमॅट’मध्ये लिहिण्यात आले. फेब्रुवारीमध्ये ही क्लिप तयार केलेल्या ट्विटर खात्याद्वारे शेअर करण्यात आली होती आणि त्यात दलाई लामा यांच्याबद्दल अपशब्द लिहिण्यात आले होते. हा व्हिडीओ काही दिवसांतच व्हायरल झाला आणि याला लाखो लाइक्स मिळाले. समाजमाध्यमांवर या व्हिडीओमुळे अनेक विनोद तयार करण्यात आले. अहवालात असे म्हटले आहे की, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक लोक अचानक दलाई लामांबद्दल अपशब्द बोलू लागले.

प्रत्यक्षात काय घडले?

लहान मुलांना तोंडाने खायला घालणे ही तिबेटमधील एक परंपरा आहे; जी अजूनही अस्तित्वात आहे. याच परंपरेनुसार, जेव्हा वृद्ध तिबेटी लोक आपल्या नातवंडांना भेटतात तेव्हा ते आपल्या नातवंडांना कुठली भेटवस्तू देऊ शकत नाहीत. ते विनोदाने नातवंडांना “तू माझी जीभ खा. कारण- माझ्याकडे दुसरे काही उरले नाही”, असे म्हणतात. दलाई लामा यांनी त्या मुलाला ‘खा’ ऐवजी ‘चोख’, असे म्हटले. कारण- ते अन्नाविषयी नव्हे, तर साखरेविषयी बोलत होते. तिबेटी भाषेत “चे ले सा” याचा अर्थ “माझी जीभ खा” असा होतो, असे ‘द डिप्लोमॅट’मध्ये स्पष्ट करण्यात आलेय. संपूर्ण व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारचे लैंगिक गैरवर्तन नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

दलाई लामा यांनी या प्रकरणी माफी मागितल्याने अनेक तिबेटी नागरिक संतापले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

त्यानंतर मुलगा आणि त्याची आई दोघांचीही मुलाखत घेण्यात आली. दोघांनाही या अनुभवामुळे आनंद झाला. काहीही अनुचित घडले नाही, असे सांगितल्याचे ‘द डिप्लोमॅट’मध्ये नमूद करण्यात आले. भारतीय मुलाने विचारले की, तो दलाई लामांना मिठी मारू शकतो का? परंतु, सुरुवातीला दलाई लामा यांना इंग्रजी शब्द समजला नाही. अहवालात असे म्हटले आहे की, तिबेटमध्ये हात मिळवणे आणि मिठी मारणे विशेषतः टाळले जाते. परंतु, त्या लहान मुलाला दलाई लामा यांनी नाराज केले नाही, असे अहवालात सांगितले आहे.

चिनी प्रचार

पश्चिमेकडील बहुतेक लोकांना तिबेटी सांस्कृतिक पद्धतींबद्दल काहीही माहिती नाही. “माझी जीभ खा” ही बिगर-लैंगिक संकल्पना आहे. याव्यतिरिक्त पश्चिमेकडील बर्‍याच लोकांना कॅथॉलिक धर्मगुरूंबद्दल माहिती आहे; जे असे कृत्य करताना दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रचारकांना दलाई लामांची समाजातील प्रतिमादेखील तशीच खराब करायचीआहे आणि तेही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात गुंतले असल्याचे दाखवून द्यायचे आहे, असे अहवालात सांगण्यात आले. त्या व्हिडीओमुळे चिनी प्रचारकांचा उद्देश सफल झाला आणि जागतिक स्तरावर दलाई लामा व तिबेटी लोकांची प्रतिष्ठा खालावली, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दलाई लामांच्या माफीने तिबेटी लोक संतप्त

या प्रकरणावर दलाई लामा यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले. त्यात त्यांनी मुलाची आणि कुटुंबीयांची माफी मागितली. त्यामुळे अनेक तिबेटी नागरिक संतापले. बहुसंख्य समर्थकांचा असा विश्वास होता की, दलाई लामा यांनी जगाची माफी मागण्याची गरज नव्हती. या व्हिडीओनंतर दलाई लामा यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ धर्मशाला आणि लडाखमध्ये उत्स्फूर्त निदर्शने केली. तिबेटच्या परंपरेनुसार जीभ बाहेर काढणे हे सन्मानाचे प्रतीक आहे. पारंपारिक तिबेटियन संस्कृतीमध्ये याचा वापर अभिवादन म्हणून केला जातो, असे त्यांनी सांगितले.

या व्हिडीओनंतर दलाई लामा यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ धर्मशाला आणि लडाखमध्ये उत्स्फूर्त निदर्शने केली. (छायाचित्र-एएनआय)

‘द डिप्लोमॅट’च्या म्हणण्यानुसार, लोकशाहीने युट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इतर सामाजिक माध्यमांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, अन्यथा ते देश-विदेशातील हुकूमशहांच्या हातातील शस्त्र होतील.

हेही वाचा : कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर जीव गमावलेल्या मुलींचे पालक दाखल करणार गुन्हा, नेमके प्रकरण काय?

चीनच्या या निर्णयामागील कारण काय?

चीनने व्यापलेल्या तिबेटमधील दडपशाहीपासून जगाचे लक्ष विचलित करण्याचा चीनचा हेतू आहे. मानवाधिकार तज्ञांनी नुकतीच एक चेतावणी जारी केली आहे की, चिनी अधिकारी तिबेटमधील मुले आणि प्रौढ दोघांनाही मोठ्या संख्येने ताब्यात घेत आहेत. ते तिबेटमधील नागरिकांची संस्कृती विसरण्यास भाग पाडत आहेत आणि त्यांना चिनी भाषिक मजुरांमध्ये बदलत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, बदला घेण्यासाठी ‘स्मीअर मोहिम’ राबावली जात आहे. दलाई लामा हिमाचलच्या धर्मशाला येथे राहून तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. ते प्रभावी नेतृत्व असल्यामुळे चीनचे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष असते. चीनने मध्यंतरी दलाई लामा यांचे नाव काळ्या यादीत टाकले होते. मुख्य म्हणजे भारताने दलाई लामा यांना दिलेला आश्रयदेखील चीनच्या भारताशी असलेल्या वैराचे एक कारण मानले जाते.