या आठवड्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील पवन या एकमेव चित्त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. पवनसारखे चित्ते आफ्रिकेतून भारतात आणले जात आहेत. या चित्ता प्रकल्पाच्या अधिकारी आणि संशोधकांना ज्या परिस्थितीत पवनचे मृत शरीर सापडले त्यावरून त्याच्या मृत्यूच्या कारणासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा चित्ता चम्बळ नदी ओलांडून पलीकडच्या नाल्यात पोहोचलाच कसा?, जर त्याचा बुडून मृत्यू झाला आहे तर त्याच्या मागच्या शरीराचाच भाग बाहेर कसा?, एखादा तरुण, सुदृढ चित्ता पाण्यात बुडेलच कसा? अशी घटना केवळ तो अशक्त किंवा कमजोर असतानाच होऊ शकते. यासारखे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. २०२२ साली सप्टेंबर महिन्यात नामिबियाहून कुनो येथे आल्यावर २०२३ साली मार्च महिन्यात तीन वर्षांच्या पवनला जंगलात सोडण्यात आले होते.

अधिकारी आणि संशोधक यांचा नेमका आक्षेप काय आहे?

वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी एनव्हीके अश्रफ यांनी पवनच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले “एखादा विचित्र अपघात वगळता, आधी काहीतरी वेगळं घडल्याशिवाय निरोगी चित्ता पाण्यात वाहून जाणार नाही किंवा पूरस्थितीत बुडणार नाही. अशा परिस्थितीत बुडून मृत्यू होणे हे प्राथमिक कारण असूच शकत नाही.” ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना चित्ता प्रोजेक्ट स्टीअरिंग कमिटीचे अध्यक्ष राजेश गोपाल म्हणाले, “पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत विषबाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.” एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही चिंतनीय बाब आहे. जर या मृत्यूच्या मागे विषबाधा असल्याचे उघड झाले तर नक्कीच यात मानवी हस्तक्षेप असू शकतो. २७ ऑगस्ट रोजी पवनचे शवविच्छेदन करण्यात आले. चार दिवस उलटले तरी त्याच्चा शवविच्छेदन अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. याविषयी कुनोच्या अधिकाऱ्याला विचारले असता; त्याने सांगितले, “जबलपूरमधील प्रयोगशाळेच्या चाचण्यांसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत आणि निकाल येण्यास थोडा वेळ लागेल.”

Future medical directives
रुग्णशय्येवरील उपचारांबाबत इच्छापत्रानुसार निर्णय
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
Orbito tripsy treatment of 86 year old man with heart problem was successful Pune news
हृदयविकारावर ८६ वर्षीय वृद्धाची मात! ऑरबिटो-ट्रिप्सी उपचार प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Gang rape of young woman in Bopdev ghat due to fear of coyote Pune print news
बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामुहिक बलात्कार; बलात्कारापूर्वी आरोपींकडून लूट
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
High Court comment on Badlapur sexual assault case accused Akshay Shinde encounter Mumbai
हे एन्काउंटर नव्हे! उच्च न्यायालयाची टिप्पणी; थेट डोक्यात गोळी झाडण्याच्या कृतीवरही बोट
Aseem Sarode on Badlapur Case
Badlapur Sexual Assualt : “पीडितेच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न”, असीम सरोदेंचा मोठा दावा
EY Pune employee death
अतितणावामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू? अतिताणाचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो?

अधिक वाचा: नामशेष होत चाललेले पक्षी, हरवलेले स्थलांतराचे मार्ग आणि विमानातून मार्गदर्शन; संवर्धनतज्ज्ञ नेमके काय करत आहेत?

अपघाताने बुडून मृत्यू?

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना चित्ता प्रोजेक्ट टीमच्या एका सदस्याने दावा केला की, “खरोखर, पवनच्या फुफ्फुसात पाणी सापडले आहे.” हे बुडून मृत्यू झाला असल्यामुळे किंवा “कंजेस्टिव हार्ट फेल्युअर किंवा न्यूमोनियामुळे” फुफ्फुसाला सूज आल्यामुळे हे घडले असल्याची शक्यता आहे. सूत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे व्हिसरल डॅमेजची (visceral damage) चिन्हे कुठेही दिसत नाहीत. “किंबहुना साप चावण्याची शक्यताही नाही, पोटातील घटक खरोखरच विषबाधा झाली आहे का, यासाठी तपासले जातील. मात्र चित्ता बुडाल्याचे दिसून आले आहे. त्याचा सुजलेला मृतदेह झुडपात अडकलेला आढळला, तो पावसाच्या पाण्यात तरंगत नाल्यात पोहोचला असावा. कदाचित पाण्याची पातळी घसरल्यामुळे शरीराचा मागील भाग पाण्याबाहेर पडला,” असं एका अधिकाऱ्याने सांगितले. मध्य प्रदेश वन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले की “शरीरावर बाहेरील दुखापत नसल्यामुळे” अपघाताने बुडून मृत्यू हे एकमेव संभाव्य कारण असू शकते.

पशुवैद्यकाने काय सांगितले?

परंतु, अवयव निकामी होणे, विषबाधा किंवा न्यूरोटॉक्सिक साप चावणे यांसारख्या मृत्यूच्या कारणांमध्ये बाह्य शरीरावर कोणत्याही प्रकारची दुखापत आढळून येत नाही. बहुतांश तज्ज्ञांनी मृत्यूमागे विषबाधा असल्याचेच कारण सांगितले आहे. पवनचा मृतदेह हा नाल्याच्या काठावर सापडला आहे. तज्ज्ञांनी सुचवल्याप्रमाणे कदाचित तो शेवटचे पाणी पिण्यासाठी तिथे गेला होता. उत्तराखंडमधील वन्यजीव विषबाधेची अनेक प्रकरणं हाताळलेल्या एका पशुवैद्यकाने सांगितले की, विषबाधेमुळे खूप तहान लागते, त्यामुळे प्राणी कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या स्रोताचा वापर करतात.

अधिक वाचा:  २०० वर्ष जुना स्टॅम्प पेपर, ईस्ट इंडिया, जातीव्यवस्था आणि महिला; तत्कालीन समाजाची नेमकी कोणती माहिती मिळते?

नवीन आव्हान

हा चित्ता प्रकल्प अनेक अडथळ्यांना तोंड देत मानव आणि पशु संघर्ष टाळण्यात यशस्वी झाला आहे, प्रकल्पाचा दुसरा वर्धापन दिन जवळ येत असताना विषबाधेने झालेला मृत्यू त्या अपवादात्मक परिस्थितीत प्रकल्पाच्या उद्देशांना आव्हान देऊ शकतो आणि जंगलात सोडण्याची वाट पाहत असलेल्या चित्तांसाठीही नवीन आव्हान निर्माण करू शकतो.

कुनोच्या कर्मचाऱ्यांनी पवनला गुमक्कड (भटकणारा) म्हणून संबोधले आहे, पवनने कुनोच्या इतर सर्व नर चित्त्यांपेक्षा उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूरवर फिरत जास्त अंतर कापले होते. प्रत्येक वेळी जेव्हा तो खूप दूर गेला तेव्हा पवनला शांत करून कुनोला परत आणले गेले. “आमच्यापैकी अनेकांसाठी पवन हा या प्रकल्पासाठी आशास्थान होता. तो स्वतंत्र होता आणि आम्ही त्याला अनेक प्रसंगी खाणं दिलं तरीही तो नियमितपणे शिकार करत असे. तो कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण आणि सहज संपर्क साधणारा होता. पण या मे महिन्यात त्याला राजस्थानहून परत आणल्यापासून तो पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्यानंतर त्याने कधीही कुनो सोडले नाही,” चित्ता प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या एका स्थानिक गावकऱ्याने सांगितले.