मोमोज खात असताना एका ५० वर्षीय व्यक्तीचा गुदरमरून मृत्यू झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडली नुकतीच घडली आहे. श्वसननलिकेमध्ये मोमोज अडकल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर अन्न नीट चावून खावे, असे एम्सने सांगितले आहे. त्यानंतर जेवण करत असताना काय काळजी घ्यायला हवी याबाबत विचारणा केली जात आहे.

दिल्लीमध्ये व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये एक ५० वर्षीय व्यक्ती रस्त्यावर मोमोज खात होती. मात्र मोमोज खात असताना या व्यक्तीला गुदमरायला लागले. त्याला श्वास घेणे अवघड झाले होते. या व्यक्तीची अस्वस्थता लक्षात घेऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत्युनंतर या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले. पोस्ट मॉर्टेम कॉम्प्यूटेड टोमोग्राफीच्या (PMTC) मदतीने या व्यक्तीच्या श्वसननलिकेमध्ये मोमोज अडकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे समोर आले. अन्न नीट चावून न खाल्ल्यामुळे या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : देशात सरकारी नोकऱ्यांची स्थिती काय आहे?

श्वसननलिकेत अन्नाचे कण अडकतात म्हणजे नेमकं काय होतं?

श्वसननलिकेमध्ये अन्नाचे कण अडकल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. यामध्ये चावलेले अन्न अन्ननलिकेत न जाता श्वसननलिकेत जाते. मोमोज खाणाऱ्या व्यक्तीसोबतही असेच झाले. या व्यक्तीच्या हायफोफॅरिन्समध्ये (अन्ननलिका आणि श्वसननलिका यांना जोडणाऱ्या नलिकेचा खालचा भाग) अन्न अडकले होते. त्यामुळे या व्यक्तीला श्वास घेता आला नाही. परिणामी त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> विश्लेषण : व्यापार तुटीचे विक्राळ रूप किती भीतीदायक?

मोमोज खातानाच अन्नाचे कण श्वसननलिकेत अडकतात का?

हा प्रकार समोर आल्यानंतर फक्त मोमोज खाताना अन्नपदार्थ श्वसननलिकेत अडकतात का असे विचारले जात आहे. याबाबत बोलताना इतर अन्नाचे कणदेखील श्वसननलिकेत अडकू शकतात. त्यामुळे अन्न घाईने गिळण्यापेक्षा अगोदर नीट चावून खावे असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. “सामान्यपणे अन्नाचा छोटासा कण श्वसननलिकेत अडकला तर लगेच खोकला येतो. खोकल्यानंतर श्वसननलिकेत अडकलेले अन्नाचे कण बाहेर फेकले जातात. फक्त मोमोच नव्हे तर वाटाणे, काजू, चॉकलेट्स, च्यूइंग गमदेखील श्वसननलिकेत अडकू शकते. प्रामुख्याने छोट्या मुलांच्या बाबतीत अशा घटना घडू शकतात. जेवत असताना हसणे किंवा बोलण्यामुळेदेखील अन्नाचे कण श्वसननलिकेत अडकू शकतात,” असे डॉ. पेटीवाला यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : अमेरिकेत मंदीचे वारे? विक्रमी व्याजदरवाढीचा भारतावर काय परिणाम?

जेवताना काय काळजी घ्यावी?

अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी खाली बसून जेवण करावे. तसेच छोटी मुलं जेवत असताना त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना मोठे घास देण्याऐवजी छोटे घास खायला द्यावेत. यामुळे अन्न श्वसननलिकेत अडकण्याची भीती कमी होईल, अशी माहिती मुंबई येथील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील आहारतज्ज्ञ डॉ. जिनल पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारतीयांच्या वांशिक शुद्धतेच्या चाचणीवरून वाद कशासाठी?

श्वसननलिकेत अन्नाचे कण अडकल्यास काय करावे?

जेवताना श्वसननलिकेत अन्नाचे कण अडकल्यास काय कारवे याबाबत डॉ. पेटीवाला यांनी सविस्तर माहिती दिली आहे. अन्नाचे कण अडकल्यानंतर एखादी व्यक्ती खोकत असेल तर त्याला काहीही न करणे चांगले. श्वसननलिकेत अन्नचे कण अडकलेले असताना व्यक्ती बोलू शकत असेल तर श्वसननलिकेचा काही भागा मोकळा आहे असे समजावे. अन्नाचे कण अडकले असतील तर त्या व्यक्तीला पिण्यासाठी पाणी देऊ नये. कारण पाण्यामुळे हवा श्वसननलिकेपर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो,” असे डॉ. पेटीवाला यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या दिलावर सिंगचा फोटो सुवर्ण मंदिरात का लावण्यात आला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच जर व्यक्तीला बोलता येत नसेल. फक्त मान डोलावून आपल्या प्रश्नांचे उत्तर देत असेल तर त्या व्यक्तीच्या घशात अन्नाचे कण पूर्णपणे अडकलेले आहेत असे समजावे. अशा वेळी त्या व्यक्तीला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जावे. डॉक्टरपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याच्या छातीवर दाब द्यावा किंवा हेमिलिच मॅन्यूव्रे (Heimlich Maneuvre) देण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे श्वसननलिकेत अडकलेले कण बाहेर येण्यास मदत होईल.