भारतामधील Skyroot Aerospace ही खाजगी कंपनी लवकर कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यासाठी या कंपनीने स्वबळावर Vikram S नावाचे रॉकेट विकसित केले आहे. उपग्रह प्रक्षेपणासाठी असे रॉकेट विकसित करणारी ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ‘इस्रो’च्या ‘श्रीहरीकोटा’ या तळावरुन हे रॉकेट अडीच किलो वजनाच्या एका उपग्रहाला कवेत घेऊन उड्डाण करेल. ही एक प्रायोगिक मोहिम असणार आहे, या पहिल्या उड्डाणाला Prarambh- प्रारंभ असं नाव देण्यात आलं आहे.

Vikram S नेमके कसं आहे?

Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
bengaluru woman online fraud case
महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!
blow to airline
रद्द केलेल्या तिकिटाची वाढीव दराने विक्री प्रकरणी विमान कंपनीला दणका, भरपाईपोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश

देशात पहिल्यांदाच खाजगी कंपनीने विकसित केलेल्या Vikram S ची रॉकेटची उंची ही २० मीटर असून त्याचे इंधनासहीत वजन हे ५०० किलो एवढे आहे. देशात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राचा पाया घालणारे इस्रोचे संस्थापक डॉ विक्रम साराभाई यांचे नाव या रॉकेटला देण्यात आले आहे. या पहिल्या प्रायोगिक उड्डाणात हे रॉकेट साधारण १०० किलोमीटर अंतरापर्यंत उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. असं असलं तरी पहिल्यात प्रयत्नात हे रॉकेट नेमकी किती उंची गाठणार हे कंपनीने अधिकृत जाहीर केलेले नाही.

या रॉकेटमध्ये शक्तीशाली असे Kalam-100 नावाचे इंजिन असणार आहे. देशाचा पहिला उपग्रह अवकाशात पाठवणाऱ्या मोहिमेचे प्रमुख असलेल्या . दिवंगत राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांचे नाव हे संबंधित इंजिनाला देण्यात आले आहे.

या पहिल्या प्रायोगिक उड्डाणाच्या अनुभवानंतर Vikram श्रेणीतील तीन विविध रॉकेट ही विकसित केली जाणार असल्याचं Skyroot Aerospace ने स्पष्ट केलं आहे. ही रॉकेट ५०० किलोमीटर उंचीपर्यंत ८०० किलोग्रॅम वजनाचे उपग्रह भविष्यात प्रक्षेपित करु शकेल. उपग्रह पाठवण्यासाठी असे रॉकेट हे अवघ्या काही तासांत सज्ज केले जाणार असल्याचा दावाही या कंपनीने केला आहे.

थोडक्यात इस्रो आज बहुतांश उपग्रह प्रक्षेपणाच्या मोहीमा जी करत आहे नेमक्या तशाच मोहीम करण्याची क्षमता या कंपनीने विकसित केलेले रॉकेटच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे.

उपग्रह प्रक्षेपणात खाजगी कंपनीच्या प्रवेशाचे महत्व काय?

काही वर्षापर्यंत जगामध्ये अवकाश तंत्रज्ञान क्षेत्र हे १०० टक्के सरकारी अधिपत्याखाली होते. म्हणजेच कृत्रिम उपग्रह जरी सरकारी कंपन्यांसह विविध खाजगी कंपन्या बनवत असल्या तरी हे उपग्रह अवकाशात पोहचवण्यासाठी आवश्यक असलेले रॉकेट-प्रक्षेपक बनवण्याची मक्तेदारी ही सरकारी कंपनीकडेच होती. अवकाश तंत्रज्ञान या विशेषतः उपग्रह प्रक्षेपण ही खार्चिक, वेळखाऊ आणि अत्यंत क्लिष्ट गोष्ट असल्याने काही देशांमध्ये सरकारी कंपनीच्या नियंत्रणाखाली हळूहळू खाजगी कंपन्यांनी रॉकेटचे भाग बनवायला सुरुवात केली.

आता या क्षेत्राचा व्याप इतका वाढला आहे की अमेरिकेसारख्या देशामध्ये उपग्रह प्रक्षेपण क्षेत्र हे खाजगी कंपनीसाठी खुले करण्यात आले आहे. आता तर ‘स्पेस एक्स’ सारखी खाजगी कंपनी ही ‘नासा’पेक्षा जास्त उपग्रह प्रक्षेपण मोहिमा फत्ते करत आहे. नेमके हेच आता भारतातही भविष्यात Skyroot Aerospace सारख्या खाजगी कंपनीच्या उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रातील प्रवेशामुळे घडू शकणार आहे.

उपग्रहांची वाढती मागणी

दिवसेंदिवस कृत्रिम उपग्रहांची मागणी वाढत आहे. त्यातच लहान उपग्रहांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. उपग्रह प्रक्षेपण करणारे जे काही मोजके देश आहेत त्यांच्याकडे उपग्रह प्रक्षेपणासाठी रांग लावत वाट बघत बसण्याची वेळ ही विविध कंपन्यांवर आली आहे. पुढील दहा वर्षात सुमारे २० हजार कृत्रिम उपग्रहांची गरज, ज्यामध्ये बहुसंख्य उपग्रह हे ५०० किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे असतील असा एक अंदाज आहे. इस्त्रोकडेही उपग्रह प्रक्षेपणसाठी मोठी मागणी आहे. तेव्हा Skyroot Aerospace सारख्या खाजगी कंपनीच्या प्रवेशामुळे भविष्यात इस्रोवरील भार कमी होईलच आणि इतर मोहिमांकडे पुरेसा वेळ देणे इस्त्रोला शक्य होणार आहे.

IN-SPACe ची भूमिका महत्त्वाची

जून २०२० मध्ये केंद्र सरकारने देशातले अवकाश तंत्रज्ञान क्षेत्र हे खाजगी कंपन्यांकरता खुले केले. यासाठी केंद्र सरकारच्या अवकाश विभागाच्या नियंत्रणाखाली IN-SPACe ची स्थापना करण्यात आली. खाजगी कंपन्यांनी रॉकेट, उपग्रह आणि संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यास एक खिडकी योजनेअतंर्गत आवश्यक परवानगी देण्याची व्यवस्था IN-SPACe द्वारे करण्यात आली आहे. म्हणजे अवघ्या सव्वा दोन वर्षातच या सुविधेमुळे एका खाजगी कंपनीने उपग्रहांच्या प्रक्षेपणाठी रॉकेट विकसित केले आहे हे विशेष.

भारतात पूर्वी चारचाकी लहान गाडी, विविध अवजड उद्योग, दुरसंचार क्षेत्र ( telecommunication ) किंवा अगदी सरकारी वाहिनी ( channels ) यामध्ये सरकारचीच मक्तेदारी होती. काही वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने हे क्षेत्र खाजगी कंपन्यांकरता खुले झाल्याने भारताचा चेहरामोहरा बदलला. हेच नेमकं भविष्यात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातही Skyroot Aerospace सारख्या खाजगी कंपनीच्या प्रवेशामुळे होणार आहे.