सध्या संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट पसरली असून नागरिक हैराण झाले आहेत. त्यात जर तुम्हाला सध्या चिंताग्रस्त, तणावपूर्ण वाटत असेल आणि वारंवार चिडचिड होत असेल तर हादेखील वाढत्या तापमानाचा परिमाण आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम मानसिक आरोग्यावरदेखील होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे स्वभावात होणारे बदल हे वाढलेल्या तापमानाशी संबंधित असल्याचं अभ्यासातून स्पष्ट होत आहे.

उष्ण वातावरणात जास्त वेळ राहिल्याने रक्तदाब कमी होणं, शरिरातील पाण्याची पातळी कमी होणे (डिहायड्रेशन), स्नायू दुखणे आणि गुंगी येणे असे त्रास जाणवू शकतात. अभ्यासानुसार, वाढलेलं तापमान एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासदेखील घातक ठरू शकतं, असं आढळून आलं आहे.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

उष्णतेची लाट म्हणजे काय?

उष्णतेची लाट हा शब्द गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांच्या परिचयाचा झाला आहे. वाढलेलं तापमान म्हणजे उष्णतेची लाट असा समज आहे. पण याची एक तांत्रिक व्य़ाख्या ठरवण्यात आली आहे.

समुद्रकिनारी भागातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशांच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे. सामान्यपणे तापमान ३७ अंशांच्या वर गेल्यानंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो. तर मैदानी भागामध्ये हेच निकष ४० अंश इतके आहेत. डोंगराळ भागात हाच निकष ३० अंशांचा आहे.

विश्लेषण: विदर्भ सदा तापण्याची कारणे काय आहेत? चंद्रपूर, ब्रह्मपुरीतच सर्वाधिक तापमानवाढ का नोंदवली जाते?

याशिवाय एखाद्या भागामधील तापमान हे सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी जास्त नोंदवल्यास तिथे उष्णतेची लाट जाहीर केली जाते. तसंच कमाल तापमान हे सरासरीपेक्षा ६.४ अंशांनी जास्त नोंदवले गेल्यास उष्णतेची तीव्र लाट जाहीर केली जाते. तापमानाची ही परिस्थिती सलग दोन दिवस राहिल्यास उष्णतेची लाट असल्याची घोषणा केली जाते.

याशिवाय जेव्हा एखाद्या भागात कोणत्याही दिवशी कमाल तापमान ४५ अंश आणि ४७ अंशांपर्यंत नोंदवलं जातं तेव्हा उष्णतेची लाट आल्याची स्थिती असते.

उष्णतेची लाट मानसिक आरोग्यवार परिणाम कसा करते?

Mint Lounge च्या अहवालात हवामान बदलावरील समितीने दिलेल्या माहितीनुसार, अती उष्णतेमुळे मानसिक आरोग्य, शारिरीक आरोग्य, आयुष्यातील समाधान, आनंद, आकलनविषयक कामगिरी आणि आक्रमकतेवर नकारात्मक परिणाम होतो.

यामध्ये सांगण्यात आलं आहे की,१६ ते २० वर्ष वयोगटातील मुलं आणि विशेषत: मुलींना जास्त धोका आहे. तसंच मानसिक, शारीरिक आणि वैद्यकीय आव्हानांचा सामना करणाऱ्यांना आणि वृद्धांना विशेषतः जास्त धोका असतो असंही सांगण्यात आलं आहे.

विश्लेषण : राज्यात उष्णतेची लाट आलीय म्हणजे नेमकं काय झालंय? उष्णतेची लाट कशी ओळखतात? ही परिस्थिती कधीपर्यंत राहणार?

द लॅन्सेटने २०२१ मधील आपल्या अहवालातही अती उष्णतेचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं सूचित केलं होतं. “उष्णतेमधील वाढ हवामान बदलाशी संबंधित असून यामुळे जगभरात मानसिक आरोग्याशी संबंधित धोके निर्माण होतात. यामध्ये परिस्थितींमध्ये होणारे बदल ते रुग्णालयात मानसिक आरोग्याशी संबंधित प्रकरणं आणि आत्महत्यांमध्ये होणारी वाढ यांचा समावेश आहे,” असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.

मानसिक आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, जास्त तापमान असल्यास शऱिराला प्रचंड थकवा आणि अस्वस्थता जाणवते ज्यामुळे नैराश्य आणि चिंतेत वाढ होऊ शकते.

अती उष्णतेमुळे आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. २०२१ मधील उष्णता आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यासंबंधी एका अभ्यासानुसार तापमानात फक्त एक डिग्री सेल्सिअसची वाढ झाल्यास मानसिक आरोग्य संबंधित मृत्यूदरात २.२ टक्के वाढ पहायला मिळाली आहे.

डाउन टू अर्थच्या (Down To Earth) अहवालानुसार, रांची येथील मानसोपचार केंद्रीय संस्थेच्या अभ्यासातही (CIP) तीव्र उष्णता असल्यास मानसिक आरोग्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. उत्साहीपणा, चिडचिड आणि आक्रमकता ही काही सामान्य लक्षणं आहेत.

सीआयपी रांचीचे संचालक डॉक्टर बासुदेब दास यांनी सांगितलं आहे की, “तापमान वाढीमुळे आंतरवैयक्तिक हिंसाचारात चार टक्के आणि सामूहिक हिंसाचारात १४ टक्के वाढ होते. उष्णतेच्या लाटेदरम्यान जोखीम घेणाऱ्या वागणुकीतदेखील वाढ होते”.

आधीच मानसिक आजार असणाऱ्यांचा धोका उष्णतेच्या लाटेदरम्यान तिपटीने वाढतो असं त्यांनी सांगितलं आहे.

यावर उपाय काय?

उष्णता वाढीमुळे निर्माण होणारे धोके टाळाल्याचे असल्यास त्या दिवसांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. तसंच घरामध्ये थांबल्याने उष्णतेच्या लाटेचा मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

सकाळी किंवा संध्याकाळी खेळणं, चालण्यासाठी जाणं किंवा बाहेरील इतर गोष्टींमध्ये सहभागी झाल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.