भारतीय प्रेक्षकांना वेबसीरिजचं वेड कुणी लावलं असेल तर ते ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सीरिजने हे निर्विवाद सत्य आहे. इथल्या प्रेक्षकवर्गाने वेगवेगळ्या कारणांसाठी ही सीरिज पाहिली आहे. ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी या सीरिजचं नाव नक्कीच ऐकलं असेल. अशा या जगप्रसिद्ध सीरिजचा स्पिन-ऑफ किंवा ज्याला सध्याच्या नवीन भाषेत प्रीक्वल म्हंटलं जातं अशी एक नवीन सीरिज नुकतीच हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर येऊ घातली आहे. ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ असं त्या सीरिजचं नाव आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये घडलेल्या घटनांच्या तब्बल २०० वर्षांपूर्वीची गोष्ट सांगण्यात येणार आहे. ‘हाऊस ऑफ टार्गेरियन’ (House of Targaryen) या राजघराण्याचा इतिहास या सीरिजच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. १० भाग असणाऱ्या या पहिल्या सीझनचा पहिला भाग सोमवारी प्रसारित करण्यात आला. हा भाग पाहून ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे चाहते चांगलेच भारावून गेले आहेत.

या सीरिजमधली पात्रं, त्यांचा इतिहास, त्यांचा प्रवास हे सगळंच भारावून टाकणारं आहे. याबरोबरच अगदी ‘गेम ऑफ थ्रोन्स’पासून या सीरिजचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे यात दाखवले जाणारे ड्रॅगन्स. ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’च्या पहिल्या एपिसोडमध्ये सुरुवातीलाच आपल्याला आकाशात एका राजकुमारीला घेऊन उडणारा ड्रॅगन दिसतो आणि तिथेच ही सीरिज गेम ऑफ थ्रोन्सच्या कितपत जवळ जाऊ शकते याचा अंदाजही येतो. ही नवीन सीरिज जॉर्ज आरआर मार्टिन यांच्या ‘फायर अँड ब्लड’ या कादंबरीवर आधारित आहे.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

आणखीन वाचा : सारा अली खान आणि जान्हवी कपूर दिसणार एकत्र, ‘या’ खास कारणासाठी शेअर केली स्क्रीन

‘गेम ऑफ थ्रोन्स’ आणि ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’मध्ये ड्रॅगन्स आले कुठून?

कादंबरीनुसार Thrones-verse lore मध्ये नमूद केल्याप्रमाणे फोर्टिन फायर्स (Fourteen Fires) नावाच्या एका ज्वालामुखीमधून पहिला ड्रॅगन बाहेर आला आणि त्याला तेव्हा वलेरियन (valayrian) जमातीच्या लोकांनी पाळीव प्राण्यांसारखं पाळलं होतं. “ड्रॅगन्स हे माणसांपेक्षा कित्येक पटीने हुशार असतात, त्यांना त्यांचे शत्रू कोण आणि मित्र कोण हे बरोबर ओळखता येतं.” गेम ऑफ थ्रोन्समधल्या टिरियन लॅनिस्टर (Tyrion Lannister) या पात्राचं हे वाक्य ड्रॅगनचं या सीरिजमधलं महत्व पटवून देण्यासाठी पुरेसं आहे. सर्वप्रथम लेखक जॉर्ज आर.आर मार्टिन हे त्यांच्या कथेत ड्रॅगनचा समावेश करण्यास उत्सुक नव्हते. नंतर एका मैत्रिणीच्या सल्ल्यामुळे त्यांनी ड्रॅगन्सना या कथानकात सहभागी केलं. नुसतंच सहभागी न करता मार्टिन यांनी त्यांना अकर्षणाचं केंद्रबिंदू ठेवलं.

सीरिजमध्ये कोणते ड्रॅगन्स आहेत?

पहिल्याच भागात आपल्याला पिवळ्या रंगाचा सीरस (Syras) नावाचा ड्रॅगन बघायला मिळतो जो सीरिजमधली राजकुमारी रनेयरा टार्गेरियन (Rhaenyra Targaryen) चा अत्यंत खास आहे. शिवाय या भागाच्या शेवटी रनेयराचे काका डेमोन टार्गेरियन (Daemon Targaryen) यांचा एक लाल रंगाचा थोडा हिंस्त्र असा ड्रॅगन बघायला मिळतो. जर पुस्तकाप्रमाणे या सीरिजचं चित्रीकरण केलं असेल तर पुढच्या भागात आपल्याला आणखीन वेगवेगळे शक्तिशाली ड्रॅगन्स पाहायला मिळू शकतात.

ड्रॅगन्सचं महत्व नेमकं काय?

जॉर्ज आर आर मार्टिन यांचं हे काल्पनिक विश्व आणि त्याचे काही संदर्भ इंग्रजी आणि ब्रिटिश इतिहासात सापडतात. पण या सीरिजमध्ये वेस्टेरॉस (Westeros) मधील राजकारण आणि युद्धांमध्ये केलेला ड्रॅगनचा समावेश या गोष्टी सत्य आणि कल्पना यांचं मिश्रण आहे. कथानकानुसार ड्रॅगन हे या जगातलं अखेरचं शस्त्र आहे, आणि टार्गेरियन (Targaryen) कुटुंब त्यांचा वापर आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी करते. कारण त्यांना संपवू पाहणाऱ्या कोणत्याही शत्रूला ते ड्रॅगनच्या तोंडून निघणाऱ्या आगीत भस्मसात करू शकतात. या काल्पनिक विश्वात ड्रॅगन्सची तुलना थेट अण्वस्त्राशी केली गेली आहे.

आणखीन वाचा : काय आहे Game of Thrones? जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे..

मार्टिन यांचं हे काल्पनिक विश्व कित्येकांना भुरळ पाडणारं आहे. शिवाय ‘गेम ऑफ थ्रोन्स’प्रमाणे या सीरिजमध्येदेखील प्रत्येक पात्राच्या पार्श्वभूमीवर मेहनत घेतली गेली आहे. इतक्या प्राचीन इतिहासाशी साधर्म्य साधणारी ही वेबसीरिज केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. ज्याप्रमाणे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ बघून प्रेक्षक त्याविषयी उत्सुकतेने बोलायचे तसेच ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’च्या बाबतीतही घडतान दिसत आहे. भारतीय प्रेक्षक तर सध्याच्या बॉयकॉट ट्रेंडमुळे आणि निकृष्ट दर्जाच्या चित्रपटांमुळे प्रचंड वैतागला आहे. त्यांच्यासाठी ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ ही वेबसीरिज सर्वात उत्तम पर्याय ठरू शकते. ज्यांना ही सीरिज बघायची आहे त्यांनी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ पाहायलाच हवी हे बंधनकारक नाही. पण जर एखाद्याला या सीरिजचा मनसोक्त आनंद लुटायचा असेल तर त्यांनी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ निश्चित पहावी. एकंदर वेबसीरिजचा साचा आणि कथेचा सुर समजून घेण्यात त्याची नक्कीच मदत होईल.