नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणामध्ये (National Family Health Survey) एका बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे, ते म्हणजे बहुसंख्य भारतीयांची पुत्राला पसंती असते. यापैकी एकमेव अपवाद मेघालयाचा असून या राज्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींना जास्त पसंती दिली जाते.

सर्वेक्षण काय सांगते?

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Loksatta chaturanga Discovery of Women Vote Bank
महिला व्होट बँकेचा शोध!
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

विवाहित जोडपी (१५ ते ४९ वयोगट) ज्यांना मुलगा व्हावासा वाटतो, मुलगी नाही अशांची संख्या प्रचंड जास्त असून त्या तुलनेत मुलापेक्षा मुलगी व्हावी असे वाटणारी जोडपी खूप कमी आहेत. ज्या विवाहित व्यक्तीला एक मुलगा आहे, त्याला आणखी मूल व्हावे असे वाटण्याची शक्यता कमी दिसून आली. अर्थात, असे असले तरी बहुतेक सर्व भारतीयांना वाटते की आदर्श परिवारामध्ये किमान एक मुलगी तरी असावीच.

आदर्श कुटुंब

मुलींपेक्षा मुले जास्त असावीत असे वाटणाऱ्या विवाहित पुरुषांचे प्रमाण (१६ टक्के) हे मुलांपेक्षा मुली जास्त असावेत असे वाटणाऱ्या पुरुषांपेक्षा (चार टक्के) चौपट आहे. हेच प्रमाण महिलांमध्ये तर पाच टक्के जास्त असून ते अनुक्रमे १५ टक्के व तीन टक्के आहे. बहुतेक सहभागींनी किमान एक मुलगा व किमान एक मुलगी असावे असे सांगितले आहे.

राज्यनिहाय कल

मिझोराम (३७ टक्के), लक्षद्विप (३४ टक्के) व मणीपूर (३३ टक्के) येथील पुरुषांची तर बिहारमधील (३१ टक्के) महिलांची तीव्र इच्छा आहे की मुलींपेक्षा मुले जास्त असावीत. बिहारमधल्या फक्त दोन टक्के महिलांनी मुलांपेक्षा जास्त मुली असण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सर्व राज्यांमध्ये आणि महिला व पुरुष दोघांचा विचार केला तर फक्त मेघालयातील महिलांना मुलांपेक्षा जास्त मुली असाव्यात असे वाटते. या राज्यातील महत्त्वाच्या जमाती वारशामध्ये मातृसत्ताक पद्धतीचे अनुकरण करतात.

मेघालयामध्येच सर्वात जास्त पुरुषांचे प्रमाण आहे (११ टक्के) ज्यांना मुलांपेक्षा मुली प्रिय आहेत. पण अन्य राज्यांप्रमाणेच जेव्हा असा प्रश्न आला की मुलींपेक्षा जास्त मुले हवीत का तर त्याचे उत्तर १८ टक्के पुरुषांनी होकारार्थी दिले. अर्थात, अन्य राज्यांच्या तुलनेत मुलींना मुलांपेक्षा जास्त पसंती असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. याचे उत्तर देताना शिलाँगमधील अँजेला रंगड या सामाजिक कार्यकर्तीने सांगितले की आमचा समाज मातृसत्ताक आहे. पण मग या राज्यातील पुरुष याच राज्यातील महिलांपेक्षा मुलींपेक्षा मुलींना पसंती का देतात?

याचे कारण आहे इथल्या पुरुषांनाही पुरुषसत्ताक समाजाची ओढ आहे आणि मातृसत्ताक पद्धतीमुळे त्यांच्यावर अन्याय होतोय अशी अनेकांची धारणा आहे.

तिसरे मूल हवे की नको?

या सर्वेक्षणात हे ही बघण्यात आले की विवाहित जोडप्यांना अधिक अपत्ये हवीत की नकोत? ज्या दांपत्याला पहिला मुलगा आहे, त्याला अधिक मूल व्हायची इच्छा कमी दिसून आली. तर ज्यांना पहिली अपत्ये आहेत पण मुलगा नाहीये अशांना आणखी मूल व्हायची इच्छा दिसून आली. ज्यांना दोन मुले आहेत व त्यात एक मुलगा आहे, अशांमधील दहापैकी नऊ जणांनी तिसरे अपत्य नको असे सांगितले. हा कल स्त्री पुरूष अशा दोघांमध्ये दिसून आला.