Google Layoffs: जागतिक स्तरावर सुरु असलेल्या मंदीचा फटका गूगलसारख्या बड्या कंपनीलाही बसला आहे. फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता गूगलने ही १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची तयारी सुरु केली आहे. गुगलची मातृसंस्था असणाऱ्या अल्फाबेट कंपनीने जगभरातील एकूण कर्मचार्‍यांपैकी ६ टक्के नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी एका ईमेलद्वारे नोकरकपातीची घोषणा केली. या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी आपण घेत आहे, असंही पिचाई यांनी ईमेलमध्ये लिहिलं. आता नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी व महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गूगलने या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे तसेच काही रक्कम (सेव्हरन्स पे) म्हणून देण्याचे सुद्धा वचन दिले आहे.

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मेलमध्ये लिहिले की, नोकरी शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांना आमच्याकडून मदत केली जाईल. तसेच कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील १६ महिने म्हणजेच ४ महिने २ आठवड्यांचा पगार सुद्धा दिला जाईल. नोटीस पिरियडवर असणाऱ्या तसेच त्वरित नोकरीवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी गूगलची सॅलरी व पेन्शन योजना कशी आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

हे ही वाचा<< बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?

कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना गूगल काय देणार?

सुंदर पिचाई यांनी सांगितले की, कंपनी कर्मचाऱ्यांच्या नोटीस पिरियडची पूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. नोटीस पिरिएड हा ६० दिवस म्हणजेच साधारण २ महिन्यांचा आहे. नोकरी गमावणाऱ्यांना २०२२ चा बोनस, भरपगारी सुट्ट्यांची रक्कम, हेल्थ केअर असे लाभ दिले जातील. गूगल या कर्मचाऱ्यांना नवीन जॉब मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. तसेच अमेरिकेच्या बाहेरील कर्मचाऱ्यांना स्थानिक नियमावली लक्षात घेऊन पॅकेज देण्यात येणार आहे.

हे ही वाचा<< Spotify Layoff: Spotify करणार पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

गूगलने कर्मचारी कपातीचा निर्णय का घेतला?

एका वर्षापूर्वीच गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गूगल खर्च कमी करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते. गूगलने ऑक्टोबर २०२२ मध्ये आर्थिक कमाई कमी झाल्याचे सुद्धा सांगितले आहे. गूगलचा नफा हा कमी होऊन १३.९ बिलियन डॉलरपर्यंत आला होता. हीच आकडेवारी पाहता कर्मचारी कपात करण्याचा निर्णय गूगलतर्फे घेण्यात आला होता.

हे ही वाचा<< विश्लेषण: दहशतवादी हल्ल्यावर आधारित ‘Faraaz’ चित्रपटाला पीडितांचे कुटुंबच का करत आहे विरोध?

दरम्यान, मागील काही काळात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मेटा, ट्विटर आणि अॅमेझॉनसह इतर अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. ढासळती जागतिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गुगलनेही नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला.