ज्ञानेश भुरे

नैसर्गिक पृष्ठभागाच्या हिरवळीवर खेळला जाणारा हॉकी खेळ काळ बदलू लागला, तसा कृत्रिम पृष्ठभागावर (टर्फ) खेळला जाऊ लागला. या कृत्रिम मैदानातही सातत्याने बदल होत गेले. त्याचा वापर खर्चीक होऊ लागला. हॉकी खेळही प्रगती करू लागला. खेळणाऱ्या देशांची संख्या वाढू लागली. त्यामुळे हॉकी पुन्हा सर्वसमावेशक आणि सर्वांना खेळता येईल असा व्हायला हवा यासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ पुन्हा नव्याने विचार करू लागला आहे. कदाचित हॉकी पुन्हा हिरवळीवर खेळली जाऊ शकते. यावर निर्णय व्हायला वेळ लागेल. पण, सध्या पाणी वापरण्यात येणाऱ्या टर्फचा वापर २०२४ पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतच आहे यावर महासंघ ठाम आहे. या सगळ्यावर टाकलेला दृष्टिक्षेप…

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

ॲस्ट्रो टर्फ मैदान म्हणजे काय?

ॲस्ट्रो टर्फ पृष्ठभाग म्हणजे नॉयलॉनच्या धाग्याचे गालिचे, पुढे जाऊन हा धागा पॉलिथिनचा आला. या मैदानावर चेंडू बाऊन्स व्हायचा आणि लवकर पुढे सरकत नसे. स्टिकही या धाग्यांमध्ये अडकायची. त्यामुळे पाण्याचा वापर झाला, तर या अडचणी दूर होतील असे समोर आले. त्यामुळे मैदानावर पाणी मारण्यास सुरुवात झाली. अशा मैदानावर खेळाडू पडल्यास जखमही होत नव्हती. त्यामुळे टर्फचा वापर वाढू लागला. अर्थात, त्यावर पाणी मारण्याचे प्रमाणही ठरलेले असते. हॉकी महासंघाने सर्वात प्रथम १९७६ मॉंट्रियल ऑलिम्पिक स्पर्धेत टर्फचा उपयोग करण्यात आला. त्यावेळी टर्फ हिरवे होते. सिडनी २००० ऑलिम्पिकनंतर टर्फ हिरवे झाले. लंडन २०१२ ऑलिम्पिकनंतर हेच टर्फ निळे झाले. रियो २०१४ ऑलिम्पिकनंतर नॉयलानच्या लांब धाग्याने तयार केलेली टर्फ आस्तित्वात आली. ही अधिक वेगवान होती. टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये टर्फ मैदानावर उसाचा वापर केला गेला. त्यामुळे पाणी लवकर सुकत नव्हते. तेव्हापासून हॉकी महासंघ मैदानाच्या पृष्ठभागाबद्दल नव्याने विचार करत होता.

हॉकी मैदानाचा पृष्ठभाग बदलण्याचा निर्णय का घेण्यात आला ?

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ हॉकीला पुन्हा अधिक समावेशक आणि व्यवहार्य बनविण्यासाठी पुन्हा नैसर्गिक गवताकडे वळण्याचा विचार करत आहे. मैदानाच्या देखभालीचा खर्च वाढत आहे. याबाबत अजून हा निर्णय झालेला नाही. पण, २०२४ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही पाणी मारण्यात येणाऱ्या ॲस्ट्रो टर्फवर खेळली जाणारी अखेरची स्पर्धा असेल. त्यानंतर पुन्हा एकदा हॉकी नव्या पृष्ठभागावर खेळली जाणार आहे आणि ही नैसर्गिक हिरवळ असेल असा अंदाज बांधला जात आहे.

विश्लेषण: फुटबॉलमध्ये व्हाईट कार्डचा वापर का केला जातो? ‘फिफा’ची मान्यता मिळणार का?

हॉकी महासंघाला या नैसर्गिक गवताच्या मैदानाकडे का वळावे लागले?

सर्व टर्फ मैदानांवर भरपूर पाणी मारावे लागते. याचा फायदा असा की चेंडू उसळी घेत आणि नियंत्रित करता येतो. मात्र, याची देखभाल खूप महाग ठरते. टर्फ टिकविण्यासाठी साधारण ८ हजार लिटर पाणी लागते. विविध देशांमधील अनेक शहरांत अशा सुविधांचा अभाव आहे. हॉकीमध्ये अलीकडे झपाट्याने प्रगती होत आहे. पण, केवळ देखभालीच्या खर्चाने प्रगतीला खीळ बसत आहे. गवताच्या पृष्ठभागावर खेळल्याने अधिक कमकुवत आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या देशांत आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना फायदा होऊ शकतो हे पुन्हा गवतावर येण्यामागचे मुख्य उद्दिष्ट.

या निर्णयामुळे सध्या असलेल्या टर्फ मैदानांचे काय होणार?

सध्या वापरात असलेली टर्फची सर्वाधिक २४ मैदाने नेदरलॅंड्समध्ये आहेत. भारतात एकट्या ओडिशात सर्व प्रकारच्या स्तरावर वापरली जातील अशी २३ टर्फ मैदाने आहेत. साधारण २०१८ पासून यातील १७ मैदाने सुंदरगडमध्ये आहेत. संपूर्ण देशात अगदी क्लब स्तरावरची मैदाने पकडली तर त्याची संख्या ५० पर्यंत जाते. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव घेता येतील अशी सर्वोच्च दर्जाची टर्फ ही या दोन देशांतच आहेत. विश्वचषक स्पर्धेसाठी राऊरकेला येथे उभारलेल्या मैदानासाठी भारताने तब्बल १ हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. ही सर्व गुंतवणूक वाया जाणार का, अशी शंका होती. मात्र, सध्या ही गुंतवणूक वाया जाणार नाही. या टर्फच्या मैदानांचे आयुष्य जेवढे आहे तेवढी ती वापरायची. त्यानंतर आपोआप ती बदलावी लागतील, तेव्हा पाणी मारता येणार नाहीत अशी मैदाने तयार करायला घेतली जातील.

विश्लेषण : भारतीय हॉकी संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीही का गाठता आली नाही?

ठरावीक अंतराने टर्फ बदलण्याच्या निर्णयाचा परिणाम हॉकीवर होतो का?

परिणाम होतोच असे नाही. नियम बदलला की त्या नियमांशी जुळवून घेणे जमायला हवे. नैसर्गिक हिरवळीवरून टर्फवर रुळण्यास कठीण गेले. पण,टर्फवर खेळण्याची सवय अंगवळणी पडल्यावर पुढील पिढीला अशा मैदानाशी जुळवून घेणे कठीण गेले नाही. नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असतात. त्याच्याशी जुळवून घेण्याची मानसिकता ठेवावी लागते. त्यासाठी खेळाडू मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्त असणे आवश्यक असते.