अविनाश पाटील

लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती यांच्या प्रचाराला रंग आलेला नाही. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा असून नंदुरबार वगळता एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीत भाजपच्या वाट्याला सहापैकी पाच जागा गेल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत सर्व जागा भाजप-सेना युतीने जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत पक्षीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने सर्वच पक्षांचा कस लागणार आहे.

bjp leader sanjay kshirsagar to join sharad pawar ncp
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत  होणार पक्षप्रवेश
MP Omraje Nimbalkar On Malhar Patil
“तुमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयामध्ये भाजपा आहे, आता किडनीमध्ये…”; ओमराजे निंबाळकर यांचा मल्हार पाटलांना टोला
Archana Patil joins NCP
अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; धाराशिवमधून उमेदवारी जाहीर, ओमराजे निंबाळकरांशी लढत
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी

सद्यःस्थिती काय?

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा असून सद्यःस्थितीत पाच ठिकाणी भाजप तर, नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार आहे. दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, धुळ्यात डाॅ. सुभाष भामरे, नंदुरबारमध्ये डाॅ. हिना गावित, जळगावमध्ये उन्मेश पाटील, रावेरमध्ये रक्षा खडसे हे भाजपचे तर, नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहेत. गोडसे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. महायुतीतील जागा वाटपात भाजपचे खासदार असलेल्या पाचही जागा त्यांना देण्यात आल्या असून उर्वरित नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी परस्पर गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विरोध झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाची जागा आणि गोडसे यांची उमेदवारी अधांतरी आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: “संघटित व्हा आणि जगाला आव्हान द्या!”; शहीद भगत सिंग यांनी दलित समाजाला असे आवाहन का केले?

मतदार संघांचा इतिहास काय सांगतो?

नाशिक मतदारसंघात आतापर्यंत केवळ दोन वेळा एकच उमेदवार निवडून आला आहे. त्यात काँग्रेसचे बी. आर. कवडे (१९६७, १९७१) आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (२०१४, २०१९) यांचा समावेश आहे. माजी केंद्रीय संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण (१९६२) यांनाही नाशिकने साथ दिली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप अशा सर्वच पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. दिंडोरी (पूर्वीचा मालेगाव) या राखीव मतदार संघावर काँग्रेसचे अधिक वर्चस्व राहिले आहे. धुळे मतदारसंघात १९६२ पासून सलग आठ निवडणुका काँग्रेसने ताब्यात ठेवल्यानंतर २००९ पासून भाजपने वर्चस्व मिळविले आहे. गांधी घराण्याकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होणाऱ्या नंदुरबार या राखीव मतदार संघात सलग १२ निवडणुकांत (त्यात सलग आठ वेळा माणिकराव गावित) काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण मागील दोन निवडणुकांपासून भाजपने मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. जळगाव (पूर्वीचा एरंडोल) मतदारसंघात १९५२ पासून १९८९ पर्यंत (१९७७ अपवाद) काँग्रेस आणि त्यानंतर (१९९८ अपवाद) भाजपचा दबदबा राहिला आहे. रावेर मतदारसंघातही भाजपने तीन निवडणुकांपासून जम बसवला आहे.

महायुतीत स्थिती काय?

दिंडोरीत डाॅ. भारती पवार यांना महायुतीअंतर्गत कोणताही विरोध नसला तरी भाजपचे इतर जागांवरचे उमेदवार तितके भाग्यशाली नाहीत. नंदुरबारमध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा उमेदवारी मिळविणाऱ्या डाॅ. हिना गावित यांना पक्षातंर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. खुद्द त्यांचे काका राजेंद्र गावित, शिंदे गट यांनी हिना यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, अशी मागणी केली होती. त्यासाठी मेळावेही घेण्यात आले होते. धुळ्यातही उमेदवारीसाठी इच्छुक अनेक जण अजून डाॅ. सुभाष भामरे यांच्यासाठी कार्यरत झालेले नाहीत. जळगावात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्याने पाटील समर्थक नाराज आहेत. रावेरमध्ये रक्षा खडसे यांना परत उमेदवारी दिल्याने इच्छुक अमोल जावळे यांच्या रावेर, यावल तालुक्यांतील समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. महायुतीतील नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विरोध आहे. भाजपने तर ही जागा आपणास मिळावी म्हणून दबाव वाढवला आहे. त्यातच मनसेचा महायुतीत समावेश झाल्यास त्यांच्याकडूनही नाशिकवर दावा करण्यात येण्याची स्थिती आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: हिंदू कोड बिल: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?

महाविकास आघाडीत बेबनाव?

महाविकास आघाडीत नाशिक आणि जळगाव हे दोन मतदारसंघ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला, नंदुरबार आणि धुळे काँग्रेस तर, रावेर आणि दिंडोरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला जाण्याचे निश्चित आहे. नाशिकच्या जागेवर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव प्रारंभी पुढे करण्यात आले होते. परंतु, नंतर ते मागे पडले. शिवसेनेचे माजी महापौर दशरथ पाटील, शांतिगिरी महाराज, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. दिंडोरीत शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित होत नसताना मविआकडून माकपनेही दावा ठोकला आहे. धुळ्यात काँग्रेसला उमेदवार सापडेनासा झाला आहे. त्यातच एमआयएमने या मतदारसंघात उमेदवार दिल्यास काँग्रेसपुढे मत विभागणीचा धोका राहणार आहे. नंदुरबारमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा अक्कलकुवा-अक्राणीचे आमदार ॲड. के. सी. पाडवी यांच्यावर विश्वास ठेवला आहे. रावेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी नकार दिल्यानंतर माजी आमदार संतोष चोधरी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित होत आहे. जळगावात ठाकरे गटापुढे एखाद्या निष्ठावंतास की नुकत्याच पक्षात आलेल्या ललिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, हा पेच आहे.

महायुतीला त्रासदायक मुद्दे कोणते?

कांद्यावरील निर्यातबंदी, घसरणारे दर, द्राक्ष पिकांना मिळणारा अत्यल्प भाव, केळी पीक विमा काढूनही विम्याची रक्कम न मिळणाऱ्यांमध्ये असलेला असंतोष, कापूस उत्पादकांना योग्य भाव मिळत नसल्याने वारंवार करावी लागणारी आंदोलने आणि सरकारकडून होणारे दुर्लक्ष, अल्पसंख्यांक समाजात असलेली नाराजी, बेरोजगारी हे मुद्दे महायुतीच्या उमेदवारांना त्रासदायक ठरू शकतील.