International Day for Disaster Risk Reduction 2023 : आपत्तीची जोखीम कमी करणे म्हणजेच Disaster Risk Reduction (IDDR) हा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आपत्तीबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, मानवी जीवनावर होणाऱ्या आपत्तीच्या परिणामांची माहिती देणे आणि आपत्ती निवारणाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे यासाठी हा दिवस समर्पित करण्यात आला आहे. आपत्तीमुळे समाजाला निर्माण होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांतून स्वतःचे प्राण वाचविणे याबाबत जनजागृती करणे, हे या दिवसाचे मुख्य ध्येय आहे.

आपत्तीबाबतची जागरूकता वाढविणे आणि आपत्तीची जोखीम कमी करण्यामध्ये लोकांनी हिरिरीने सहभागी व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवशी जगभरात आपत्ती जोखीमीची माहिती देणारे कार्यक्रम, शिबिरे, व्याख्यान आणि परिषदा आयोजित केल्या जातात. आपत्ती निवारणासाठी सज्ज राहणे आणि मानवी जीवनावर आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमाद्वारे प्रयत्न केले जातात.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?

हे वाचा >> १७ वर्षांचे दुर्लक्षच महाराष्ट्राला भोवते आहे! २००७ साली आयपीसीसीने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

यावर्षीची थीम काय आहे?

‘चांगल्या भविष्यासाठी असमानतेशी लढा’ अशी थीम यावर्षी या दिवसाला देण्यात आली आहे. यूएन डॉट ऑर्गने दिलेल्या माहितीनुसार, “आपत्ती आणि असमानता यातील संबंधांवर यावर्षी आपत्ती जोखीम कमी करण्याच्या दिनानिमित्त लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आपत्ती आणि असमानता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूचे संकट दुसऱ्या बाजूला आणखी तीव्र करते. जसे की, सेवा आणि सुविधांची असमान उपलब्धता. यामुळे असुरक्षित गटातील लोकांना आपत्तीचा धोका अधिक जाणवतो. तसेच आपत्तीच्या परिणामांमुळे असमानता आणखी वाढते आणि असुरक्षित गटातील लोक गरिबीच्या दरीत आणखी लोटले जातात.”

हे वाचा >> विश्लेषण : कोकणात भूस्खलनाचा धोका का?

या दिनाचा इतिहास काय आहे?

संयुक्त राष्ट्राच्या महासभेने १९८९ पासून आपत्ती कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यास सुरुवात केली. या दिनाच्या माध्यमातून धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जागतिक पातळीवर आपत्ती ओढवण्याचे प्रमाण कमी करणे या विषयांना प्राधान्य देण्यात आले. १९८९ पासून १३ ऑक्टोबर या दिवशी आपत्ती कमी करण्याबाबत जागृती करणारे, हा विषय प्रभावीपणे मांडणारे आणि या विषयाला हातभार लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना गौरविण्यात येते, तसेच त्यांच्या कार्याची दखल घेण्यात येत असते.

हे वाचा >> सह्याद्रीच्या कडय़ाची ढाल ढासळू नये.. – माधव गाडगीळ यांचा लेख

आपत्ती म्हणजे काय? आणि त्याचे प्रकार…

“एखाद्या समाजाच्या कार्यामध्ये गंभीर व्यत्यय येणे, ज्यामुळे व्यापक मानवी, भौतिक किंवा पर्यावरणीय हानी होते, जी प्रभावित समाजाची स्वतःची संसाधने वापरून सामना करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते”, अशी आपत्तीची व्याख्या वृषाली धोंगडी यांनी लोकसत्ताच्या UPSC-MPSC या करियर सदरात सांगितली आहे. धोंगडी यांनी आपल्या लेखात पुढे म्हटले की, त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे आणि जागतिक बॅंकेनेही आपत्तीची व्याख्या केली आहे. संयुक्त राष्ट्रांनुसार आपत्ती म्हणजे “अचानक घडलेली किंवा मोठी दुर्दैवी घटना; ज्यामुळे समाजाच्या (किंवा समुदायाच्या) मूलभूत ढाच्यात आणि सामान्य कार्यामध्ये व्यत्यय येतो.’’ तर जागतिक बँकेनुसार आपत्तीची (World Bank) म्हणजे मर्यादित कालावधीची असाधारण घटना; ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतो. जीवितहानी, मालमत्ता, पायाभूत संरचना, अत्यावश्यक सेवा किंवा उपजीविकेच्या साधनांचे नुकसान होते.

हे ही वाचा >> UPSC-MPSC : आपत्ती म्हणजे नेमके काय? त्याचे किती प्रकार पडतात?

आपत्तीचे प्रकार किती?

१) नैसर्गिक आपत्ती : ही आपत्ती निसर्गामुळे घडते. त्यात माणसाची भूमिका नसते. उदाहरणार्थ- भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, चक्रीवादळे, त्सुनामी, पूर, दुष्काळ, भूस्खलन, इत्यादी.

२) मानवनिर्मित आपत्ती : ही आपत्ती माणसाच्या अनिष्ट क्रियाकलापांमुळे घडते. उदाहरणार्थ- स्फोट, विषारी कचऱ्याची गळती, हवा, पाणी व जमीन प्रदूषण, धरण फुटणे, युद्ध आणि गृहकलह, दहशतवाद.

३) सामाजिक-नैसर्गिक आपत्ती : ही आपत्ती नैसर्गिक आणि मनुष्याच्या चुकीच्या कृतींच्या एकत्रित परिणामामुळे घडते. उदाहरणार्थ- पूर आणि दुष्काळाची वारंवारता, झाडांची अंदाधूंद तोडणी, डोंगराळ भागात रस्ते बांधणे, बोगदे खोदणे, खाणकाम व उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती.

महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या नैसर्गिक आपत्ती

माळीण

३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते. साखरझोपेत असलेले संपूर्ण गाव अवघ्या काही क्षणांमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला. २०१७ साली सरकार, सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने माळीण गावाचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन प्रकल्पात सुमारे ६७ कुटुंबांसाठी भूकंपरोधक घरे उभारण्यात आली असून प्रत्येक घर दीड हजार चौरस फुटांचे आहे.

तळीये

रायगड जिल्ह्यातील महाडजवळील तळीये कोंढाळकरवाडी येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळून ८७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ६६ घरे उद्ध्वस्त झाली. तळीयेच्या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला माळीणची आठवण झाली, इतकी ही भीषण घटना होती. तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने घेतली असून ६६ दुर्घटनाबाधित लोकांऐवजी आजूबाजूच्या धोकादायक परिस्थितीत असलेल्या इतरही घरांना या पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत घर बांधून देण्यात येणार आहे.

इरशाळवाडी

रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीत १९ जुलै २०२३ मध्ये रात्री भूस्खलन होऊन वाडीचा बहुतांश भाग हा दरडीखाली दबला जाऊन मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. दुसऱ्या दिवशी २० जुलैपासून सुरू असलेले बचावकार्य चार दिवस चालले. इरशाळवाडीत एकूण ४३ कुटुंबे राहत होती, त्यांची लोकसंख्या २२९ इतकी असून त्यापैकी ४४ लोक मृत्यू झाल्याची नोंद त्यावेळी प्रशासनाने केली होती.