एमपीएससीने राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय जून २०२२ मध्ये घेतला. आता राज्यसेवा परीक्षा यूपीएससीच्या धर्तीवरच वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. हा बदल २०२५ पासून लागू होईल…

परीक्षेचे सध्याचे स्वरूप काय आहे?

article about mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा – बुद्धिमत्ता चाचणी
Revised schedule, admissions ,
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
BA BSc Bed Law 5 year courses admissions open Mumbai
बीए/बीएस्सी बीएड, विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात
MPSC Mantra  Gazetted Civil Services Joint Prelims Exam Intelligence Test
MPSC मंत्र : राजपत्रित नागरी सेवा सयुक्त पूर्व परीक्षा: बुद्धिमत्ता चाचणी
mpsc Mantra Comprehension Skills Gazetted Civil Services Joint Preliminary Examination
mpsc मंत्र: आकलन कौशल्ये; राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
Hindustan Copper Limited Recruitment 2024 hcl junior manager 56 post bharati 2024 notification how to apply online
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ‘या’ विभागांत ५६ पदांसाठी भरती सुरू, पगार एक लाखांच्यावर, असा करा अर्ज
FYJC Admission Will Maratha Reservation Apply
अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर; FYJC प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार का? शिक्षण संचालकांचे उत्तर वाचा
What exactly does the NTA organization which is in discussion due to the NET scandal do
‘नीट’, ‘नेट’ घोळामुळे चर्चेत असलेली ‘एनटीए’ संस्था नेमकी काय करते?

‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षा सध्या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन पातळ्यांवर होते. मुख्य परीक्षेत सहा प्रश्नपत्रिका असतात. सामान्य अध्ययनाच्या प्रत्येकी १५० गुणांच्या चार प्रश्नपत्रिका असतात. त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात. मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकांत ५० गुणांसाठी वर्णनात्मक, तर ५० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात. मुलाखतीसाठी शंभर गुण असतात. एकूण परीक्षा आठशे गुणांची असते.

वर्णनात्मक परीक्षा कशी घेतली जाईल?

राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील प्रश्नपत्रिका क्रमांक दोन अर्थात ‘सी सॅट’ हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने ‘एमपीएससी’ने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती. समितीने केलेल्या शिफारशीनुसार ‘सी सॅट’ विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेतला. या समितीच्या कार्यकक्षेत राज्यसेवेची परीक्षा आणि अभ्यासक्रम सुधारणांचाही समावेश होता. या संदर्भातील समितीच्या शिफारशी ‘एमपीएससी’ने स्वीकारल्या. त्यानुसार २०२३ पासून सुधारित पद्धतीत वर्णनात्मक स्वरूपाच्या नऊ प्रश्नपत्रिका असतील. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी ३०० गुणांच्या असतील. मराठी किंवा इंग्रजी निबंधाची एक, सामान्य अध्ययनाच्या एकूण चार, वैकल्पिक विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील. कालानुरूप बदल करून परीक्षा आणि अभ्यासक्रमाची रचना नव्याने करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्यास मदत होईल. तसेच सुधारित रचनेमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांना आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : मध्यरात्रीस खेळ चाले..! फ्रेंच ओपन स्पर्धेतील सामने संयोजनाबाबत टेनिसपटू का झालेत नाराज?

संयुक्त परीक्षेतील बदल…

राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट- अ आणि गट- ब संवर्गासाठी महाराष्ट्र संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच पूर्वपरीक्षा होईल. परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचा पसंतीक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार अर्ज भरावा लागेल. जितके अर्ज पूर्वपरीक्षेला आले असतील त्यानुसार मुख्य परीक्षेतील उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल व पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संबंधित संवर्गासाठी म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य सेवा, कृषी सेवा मुख्य परीक्षा आदी वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येतील.

वर्णनात्मक परीक्षा २०२३ पासून लागू करण्यास विरोध का होता?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जून २०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०२३ पासून होणार होती. मात्र एका वर्षातच परीक्षेत इतका मोठा बदल होत असल्याने जुन्या परीक्षा पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांचे नुकसान होईल, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना आयोगाने किमान तीन वर्षांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नव्हता. त्यामुळे परीक्षेतील नवा बदल हा २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी राज्यातील प्रमुख शहरांत विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. राजकीय पक्षांनीही या आंदोलनांत उडी घेतली होती. राज्य शासनाने मध्यस्थी केली व ‘एमपीएससी’ने राज्यसेवा परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : हिंजवडी आयटी पार्क आता न आवडे कुणाला… पायाभूत सुविधांअभावी कंपन्यांचे स्थलांतर?

याबाबत एमपीएससीचे म्हणणे काय?

माहिती अधिकार कायद्यान्वये दिलेल्या माहितीमध्ये आयोगाने २०२५ पासून राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांना त्या दृष्टीने पुढील परीक्षांची तयारी करावी लागेल. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर ज्या वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या, त्यामध्ये आयोगाने दिलेल्या शपथपत्रातसुद्धा वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून लागू करण्यात येणार असल्याचे अधोरेखित केले होते. कायदा व सुव्यवस्था आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊनच हा निर्णय झाल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

devesh.gondane@expressindia.com