सुशांत मोरे

पनवेल ते कर्जत या दोन ठिकाणांचा प्रवास वेगवान आणि सुकर होणे आवश्यक आहे. सध्या या एकेरी मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्या, मालवाहतुकीच्या गाड्या धावतात. मात्र उपनगरीय मार्ग जोडला गेलेला नाही. तो जोडला गेल्यास झटपट आणि वेगवान प्रवास होईल. तसेच रस्ते मार्गाने प्रवासाला पर्याय मिळेल. त्यामुळे कर्जत-पनवेलदरम्यान उपनगरीय रेल्वे मार्ग बांधण्यासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) प्रयत्न सुरू झाले आहेत.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

कर्जत-पनवेल जोडणे का गरजेचे?

गेल्या काही वर्षात पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुले उभी राहिली आहेत. कर्जतमध्येही वर्दळ वाढली. पनवेल आणि कर्जतदरम्यान मोठ्या प्रमाणावर माल आणि प्रवासी वाहतूक होऊ लागली आणि त्याप्रमाणे मागणी वाढली. त्यामुळे या दोन ठिकाणांदरम्यान मेल-एक्स्प्रेस आणि मालवाहतूक गाड्या धावतात. मात्र या मार्गावर उपनगरीय लोकल सेवा नाही. आता त्याचीच मागणी होऊ लागली आहे. सध्या सीएसएमटी-कर्जत लोकल प्रवासासाठी दोन तास लागतात. तर सीएसएमटी-पनवेल प्रवास ७५ मिनिटांचा होतो. कर्जतच्या प्रवाशाला पनवेलला जाण्यासाठी ठाण्यापर्यंत यावे लागते आणि तेथून ट्रान्स हार्बर मार्गावरून पनवेल गाठावे लागते. पनवेलच्या प्रवाशालाही तसाच वळसा घालावा लागतो. त्यात बराच वेळ जातो. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. हा प्रवास कमी करण्यासाठी पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिका गरजेची आहे. त्यामुळे साधारण अर्धा तास वाचणार आहे.

पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिका प्रकल्प काय आहे?

एमआरव्हीसीकडून एमयूटीपी-३ अंतर्गत २९.६० किलोमीटरची पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यात येणार आहे. लोकल गाड्या धावू शकतील अशा दोन मार्गिका असतील. यासाठी सरकारी, खासगी आणि वनजमीन लागणार असून कामाला सुरुवातही झाली आहे. या प्रकल्पासाठी २ हजार ७८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गात पनवेल, चिखले, महापे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असतील. मार्च २०२५पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. पनवेल-कर्जत एकमेकांना लोकलने जोडल्यास प्रवास वेळ वाचणार आहे.

विश्लेषण : भारतातील पहिली सरकारी ऑनलाइन टॅक्सी सेवा; जाणून घ्या ‘केरळ सवारी’चे वैशिष्ट्ये

प्रकल्पाची सद्यःस्थिती काय?

प्रकल्पातील दुहेरी मार्गाचे काम करण्यासाठी सरकारी, खासगी आणि वन अशी १३५.८९३ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील १०१.०९० हेक्टर म्हणजेच साधारण ७४ टक्के भूसंपादन झाले आहे. त्यात नऊ हेक्टर वनजमीन ताब्यात न मिळाल्याने प्रकल्प पुढे सरकू शकत नव्हता. मात्र एमआरव्हीसीकडे वनजमीन सुपूर्द करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याने प्रकल्प पुढे सरकला आहे. या मार्गिकेत दोन रेल्वे उड्डाणपूल, सहा मुख्य पूल, ३७ लहान पूल, पाच रस्त्यांवरील उड्डाणपूल असतील.

मार्गिकेत तीन मोठे बोगदे?

आतापर्यंत पादचारी पुलांसह अन्य कामांना सुरुवात झाली आहे. पुलांच्या कामांसाठी पाया खोदण्याचे कामही सुरू झाले आहे. या मार्गात तीन बोगदे असतील. एक बोगदा २.६० किलोमीटर लांबीचा असेल, तर दुसरा आणि तिसरा बोगदा २५० मीटर लांबीचा असेल. मुंबई महानगरात सध्या ठाणे दिवा दरम्यान १.६० किलोमीटरचा पारसिक बोगदा हा सर्वांत लांब बोगदा होता. आशिया खंडातील हा तिसऱ्या क्रमाकांचा लांब बोगदा मानला जात होता. या बोगद्यामुळे मुंबई-कल्याणमधील अंतर ९.६० किलोमीटरने कमी झाले होते. आता पनवेल ते कर्जतदरम्यानचा बोगदाही लांब मोठा असेल. याशिवाय पनवेल येथील मार्गिकेवरून एक छोटी उन्नत मार्गिकाही बांधण्यात येईल. अशाच प्रकारचे काम कर्जत दिशेकडूनही केले जाणार आहे. ही मार्गिका सध्याच्या मार्गिकेला समांतर असेल.