Premanand Ji Maharaj Kidney Failure: वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज हे अनेकांचे आध्यात्मिक गुरु आहेत. सध्या त्यांना मूत्रपिंडांचा गंभीर आजार झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यूट्यूबर एल्विश यादव याच्या अलीकडच्या व्हिडिओमध्ये प्रेमानंदजी महाराज म्हणाले होते की, “आता प्रकृती अशी ठीक होणार, दोन्ही किडनी फेल आहेत.” त्यांच्या या व्हिडिओंमध्येही चेहऱ्यावर सूज आणि लालसरपणा स्पष्टपणे दिसतो. मूत्रपिंडाच्या आजाराचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे जाणवते. एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेमानंदजी महाराज सध्या डायलिसिस उपचार घेत आहेत. तसेच, अनेक भक्तांनी त्यांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केलेली असली, तरी त्यांनी भक्तांच्या या विनंत्यांना स्पष्टपणे नकार दिला.

काय आहे हा आजार?

  • प्रेमानंद महाराज हे पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (Polycystic Kidney Disease-PKD) या अनुवांशिक मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत.
  • नॅशनल किडनी फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, या आजारात मूत्रपिंडांमध्ये द्रवाने भरलेल्या गाठी (सिस्ट्स) तयार होतात.
  • ज्यावेळी अशा गाठींची संख्या जास्त वाढते किंवा त्या आकाराने मोठ्या होतात तेव्हा मूत्रपिंडांचे नुकसान होऊ लागते.
  • हळूहळू या सिस्ट्स संपूर्ण मूत्रपिंड व्यापून टाकतात, त्यामुळे त्याचे कार्य थांबते आणि शेवटी किडनी फेल्युअर (मूत्रपिंड निकामी होणे) होते.

जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जेव्हा मूत्रपिंडांवर या आजाराचा परिणाम होतो, तेव्हा त्यांची रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होत जाते. पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (PKD) हा एक वेगात वाढत आजार आहे. म्हणजेच तो काळानुसार हळूहळू गंभीर होत जातो.

या आजाराचे दोन प्रकार आढळतात;

  1. ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (Autosomal Dominant PKD)
  2. ऑटोसोमल रिसेसिव्ह पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (Autosomal Recessive PKD)

यांपैकी दुसरा प्रकार ऑटोसोमल रिसेसिव्ह PKD हा अत्यंत दुर्मीळ असून त्याचे साधारणतः जन्मावेळीच निदान होते.

यासंदर्भात माहिती घेण्यासाठी हिंदुस्तान टाइम्सने फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड (मुंबई) येथील वरिष्ठ नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. वैभव केसकर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (Autosomal Dominant PKD) या आजाराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात केला.

डॉ. वैभव केसकर म्हणाले, “ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (ADPKD) हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजारात दोन्ही मूत्रपिंडांमध्ये द्रवाने भरलेल्या गाठी (सिस्ट्स) तयार होतात आणि कालांतराने त्यांचा आकार वाढत जातो. यामुळे हळूहळू मूत्रपिंडांचे नुकसान होते आणि अखेरीस किडनी फेल्युअर (मूत्रपिंड निकामी होणे) होऊ शकते. कधी कधी हे अनेक वर्षांनंतर किंवा दशके उलटल्यानंतर घडते. हा एक Progressive आजार आहे आणि उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. पण, चांगली बाब म्हणजे, वेळीच निदान आणि योग्य उपचारपद्धतीने हा आजार नियंत्रणातही ठेवता येतो. सामान्य लक्षणांमध्ये उच्च रक्तदाब, पोट, बाजू किंवा पाठीमध्ये वेदना, लघवीत रक्त येणे किंवा मूत्रपिंडात खडे (किडनी स्टोन्स) निर्माण होणे यांचा समावेश होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. वैभव केसकर यांच्या मते, ADPKD (ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज) या आजाराचे दोन प्रकार असतात.

  • टाइप १ प्रकारात आजाराची प्रगती तुलनेने जलद होते आणि साधारणतः चाळीस ते पन्नास वर्षांच्या वयोगटात रुग्णाला अंतिम टप्प्यातील किडनी फेल्युअर (End-stage kidney failure) होऊ शकते.
  • तर, टाइप २ प्रकाराची प्रगती तुलनेने हळू असते आणि त्यामध्ये साधारणतः सत्तराव्या वर्षाच्या आसपास मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता जास्त असते.
  1. डॉ. वैभव केसकर सांगतात, जरी ADPKD रुग्णांमध्ये शेवटी किडनी फेल्युअर होऊ शकते, तरीही योग्य उपचार पद्धती अवलंबल्यास हे रुग्ण डायलिसिसवर अनेक वर्षे निरोगी जीवन जगू शकतात.
  2. यासाठी त्यांनी भर दिला की, रुग्णांनी नियमित उपचार घेणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वैद्यकीय तपासण्या वेळोवेळी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  3. डॉ. केसकर पुढे सांगतात, “यशस्वी किडनी प्रत्यारोपण (Kidney Transplant) केल्यास रुग्णाच्या जीवनमानात मोठी सुधारणा होते आणि त्याचा जीवनकाळही लक्षणीय वाढतो.”

मुख्य अनुवांशिक जोखीम

पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (PKD) हा आजार वंशपरंपरागतपणे (Genetically inherited) पुढे जातो. म्हणजेच तो कुटुंबातून पुढच्या पिढीकडे संक्रमित होतो. PKD फाउंडेशनच्या माहितीनुसार, या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे जनुकांमधील (genes) म्युटेशन्स (genetic mutations) आहेत.

  • या आजाराशी संबंधित PKD1आणि PKD2 हे दोन महत्त्वाचे जीन्स आहेत.
  • ही दोन्ही जीन्स अनुक्रमे पॉलीसिस्टिन-1 (Polycystin-1) आणि पॉलीसिस्टिन-2 (Polycystin-2) नावाची प्रथिने तयार करतात.
  • ही प्रथिने मूत्रपिंड आणि यकृतातील पेशींचे कार्य नियंत्रित करतात.
  • तसेच त्या शरीरातील द्रव संतुलन राखणे, ट्युब्युल्स (नलिका) तयार करणे, आणि पेशींची वाढ नियंत्रित करणे या महत्त्वाच्या प्रक्रिया सांभाळतात.

PKD1 किंवा PKD2 या जीन्समध्ये म्युटेशन (बदल) होते. त्यावेळी मूत्रपिंडातील पेशी विपरीत रीतीने वागू लागतात. यामुळे मूत्रपिंडांमध्ये द्रवाने भरलेल्या गाठी (सिस्ट्स) तयार होतात, या गाठी पुढे जाऊन पॉलीसिस्टिक किडनी डिसीज या आजाराचे मूळ कारण ठरतात. PKD1 या जनुकातील (gene) बदल म्हणजेच म्युटेशन्स सर्वाधिक प्रमाणात आढळते. हेच बदल सुमारे ८५ टक्के ऑटोसोमल डॉमिनंट PKD (ADPKD) प्रकरणांसाठी जबाबदार असतात.

  • PKD1 म्युटेशन हा प्रकार PKD2 म्युटेशनपेक्षा अधिक गंभीर मानला जातो. कारण PKD1 असलेल्या रुग्णांमध्ये आजाराची प्रगती जलद होते. अशा रुग्णांना लवकर डायलिसिसची आवश्यकता भासते. याशिवाय, पालकांपैकी एखाद्याकडे हा अनुवांशिक बदल (genetic mutation) असेल, तर त्यांच्या संततीला हा आजार ‘डॉमिनंट पद्धतीने’ (dominant way) मिळण्याची शक्यता असते.
  • २००९ मधील ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (ADPKD) वरील एका संशोधनानुसार, प्रत्येक मुलाला हा आजार होण्याची ५० टक्के शक्यता असते. म्हणजेच, जर पालकांपैकी एखाद्याकडे PKDचा जनुकीय दोष असेल, तर त्यांच्या मुलांना तो मिळण्याची शक्यता अर्धी-अर्धी म्हणजेच ५०/५० असते.
  • संशोधकांच्या मते, या जनुकीय दोषाचा एकदा वारसा (inherit) मिळाल्यावर त्याची “रोगप्रवेश क्षमता १०० टक्के” (100% disease penetrance) असते; ज्यांना faulty gene मिळतो. त्यांना आयुष्यात कधी ना कधी हा आजार नक्की होतो.

हा अनुवांशिक झुकाव (genetic predisposition) शरीरात सुप्त राहात नाही. काही काळानंतर तो प्रत्यक्ष लक्षणांसह प्रकट होतो आणि त्यामुळे व्यक्तीला ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (ADPKD) होण्याची खात्री अधिक आहे असे मानले जाते. नेफ्रॉलॉजिस्ट (मूत्रपिंडतज्ज्ञ) सांगतात की, या आजारात सुमारे ५०-५० टक्क्यांची जोखीम असते. त्यांच्या मते, जर पालकांपैकी एकाला हा आजार असेल, तर प्रत्येक मुलाला तो वारशाने मिळण्याची ५० टक्के शक्यता असते. जरी हा आजार साधारणपणे प्रौढ वयात (adulthood) दिसून येतो, तरी काही वेळा लक्षणे लहान वयात, अगदी बालपणातही प्रकट होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.