कोकणात सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. गावा-गावात नमन, भजन, फुगडी, शक्ती-तुरा, पारंपरिक नृत्य अशा कला सादर करून बाप्पाचा गजर केला जात आहे. गणेशोत्सवात कोकणातील अनेक गावागावांत महिला गौरी आगमनाच्या रात्री फुगड्या खेळण्याचा आनंद घेतात. अनेक महिला, तरुण मुली गौराईसमोर एकत्र येत पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतात. कोकणात फुगड्या खेळण्यात वृद्ध महिलांचा हात कोणी धरू शकत नाही. अशाच प्रकारे एक वृद्ध आजी वयाचे भान विसरून फुगड्या खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहे,; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौराईच्या आगमनानिमित्ताने काही महिला पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटत आहेत. त्यात एक आजी अगदी जोशात फुगडी घालताना दिसत आहे. या आजींचे वय साधारण ७० च्या वर असेल; पण याही वयात त्यांच्या उत्साहाला तोड नाहीए. नऊवारीत आजीबाई मस्त फुगड्या एन्जॉय करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे फक्त कोकणातच होऊ शकते

कोकणातील आजीचा फुगड्या खेळतानाचा हा व्हिडीओ Loveankush_gawade नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘हे फक्त कोकणातच होऊ शकते’ असे लिहिले आहे. आजींनी घातलेल्या या फुगड्या सोशल मीडिया युजर्सनाही फार आवडल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, अप्रतिम आजी… कोकण जबरदस्त! तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, खूप अप्रतिम! असे नृत्य बघायला मिळत नाही, जुनं ते सोनं. तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, आजी १ नंबर वाह वाह…!