04 December 2020

News Flash

रोहित शर्माच्या पाठीवर सचिनची कौतुकाची थाप

टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्त्व सांभाळण्यास तयार असल्याचे मत माजी क्रिकेटवीर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

| May 27, 2015 01:59 am

कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचे कौशल्य अतिशय कौतुकास्पद आहे. दिवसेंदिवस त्याची नेतृत्वशैली अधिकाधिक परिपक्व होत आहे, अशा शब्दांत सचिन तेंडुलकर याने रोहितचे कौतुक केले.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल स्पर्धा जिंकली. ‘‘मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहितने ज्या वेळी सुरुवात केली, त्यापेक्षाही आजचा रोहित खूप वेगळा आहे. कर्णधार म्हणून त्याने अनेक आव्हाने पेलली आहेत. यंदा सुरुवातीला मुंबईची कामगिरी खूप खराब झाली. तरीही त्याने मनोधैर्य खचू न देता संघाला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले ही त्याच्या कुशल नेतृत्वाचीच पावती आहे. त्याच्या नेतृत्वात भरपूर आत्मविश्वास दिसतोय.’’, असे सचिनने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2015 1:59 am

Web Title: it is not how you start but how you finish says sachin tendulkar
टॅग Rohit Sharma
Next Stories
1 आयपीएल जेतेपदानंतर मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर जल्लोष
2 कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच यशाची गुरुकिल्ली – सचिन तेंडुलकर
3 मुंबई इंडियन्सची विजेतेपदाला गवसणी!
Just Now!
X