चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या कर्णधार आणि फलंदाज अशा दोनही भूमिका अतिशय जबाबदारीने पार पडत आहे. गेल्या हंगामात किंवा भारतीय संघातून मर्यादित शतकांच्या सामन्यात खेळताना धोनीची कामगिरी थोडीशी निराशाजनक होती. मात्र आयपीएलच्या हंगामात त्याला पुन्हा सूर गवसला आणि तो गोलंदाजांचा कर्दनकाळ बनून कर्णधारपदी परतला. धोनीच्या या खेळामुळे त्याचे चाहते खुश तर झालेच, पण धोनीने असे काय केले की त्यामुळे त्याला अचानक सूर गवसला? असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. मात्र ही सुधारणा अचानक झालेली नाही. चेन्नईचे प्रशिक्षक असलेला न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्टीफन फ्लेमिंग याने याबद्दल एक खुलासा केला आहे.

चेन्नईने रविवारी हैदराबाद संघाला धूळ चारली. रायुडूने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्यानंतर धोनीने विजयी धाव घेत सामना जिंकवून दिला. या सामन्यानंतर फ्लेमिंगने धोनीच्या यंदाच्या हंगामातील यशाचे गमक सांगितले.

फ्लेमिंग म्हणाला की यंदाचे आयपीएल सुरु होण्याआधी धोनीना कसून सर्व केला आहे. मी अनेकदा त्याला सर्व खेळाडूंच्या आधी मैदानात सरावाला हजर राहिलेले पाहिले आहे. धोनी सरावाला यायचा, तेव्हा तो आपल्या खेळावर प्रचंड मेहनत घ्यायचा. तो इतर खेळांडूंपेक्षा जास्त वेळ सर्व करायचा आणि इतर फलंदाजांपेक्षा जास्त चेंडू खेळून स्वतःला अधिक परिपक्व करण्याचा प्रयत्न करायचा. अजूनही धोनी कसून सराव करत आहे. आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळातून आपण सगळे पाहत आहोत.

हल्ली तो फलंदाजीसाठी मैदानात जातो, तेव्हा तो खूप सकारात्मक असतो. त्याच्या पायांची हालचाल योग्य दिशेत होत असते. तो क्रीजचा चांगला वापर करतो. या गोष्टी त्याला फलंदाजीसाठी उपयुक्त ठरत आहेत. तसेच सामन्याच्या शेवटच्या काही षटकांमधील त्याच्या खेळातही अधिक सुधारणा झाली आहे. हे सगळे त्याच्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे आणि त्याबद्दल त्याचे कौतकच आहे, असेही फ्लेमिंग म्हणाला.