News Flash

धोनीला ऋतूराजच्या रुपात तरुण खेळाडूमध्ये सापडला स्पार्क, म्हणाला…

३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ऋतुराजने ७२ धावांची खेळी केली

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता संघाचा पराभव केला आहे. गुरुवारी झालेल्या रंगतदार सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर ६ गडी राखून मात केली. चेन्नईकडून पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

लागोपाठ दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचं कर्णधार धोनीनं कौतुक केलं आहे. धोनी म्हणाला की, ‘ऋतुराज गायकवाडला नेटमध्ये सराव करताना पाहिलं होतं. पण त्यानतर तो करोनाबाधित झाला अन् २० दिवसांसाठी बाहेर गेला होता. हे दर्भाग्यपूर्ण झालं पण ऋतुराज गायकवाड हा हंगाम कायम लक्षात ठेवेल. युवा प्रतिभावंत खेळाडूंपैकी ऋतुराज गायकवाड एक आहे. तो खूप कमी बोलतो त्यामुळे संघ प्रबंधनाला खेळाडू ओळखण्यात अडचण निर्णाण होती. ऋतुराज गायकवाडने फलंदाजी सुरु केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तो कशा पद्धतीनं फटके मारत होता. त्याला हवं तसं तो चेंडूला टोलावत होता.’


दुबईच्या मैदानावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मात केली. या सामन्यात ५३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ऋतुराजने ७२ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. काही दिवसांपूर्वी चेन्नईचा संघ सातत्याने खराब कामगिरी करत असताना धोनीने संघातील काही तरुणांमध्ये म्हणावा तसा स्पार्क दिसला नाही असं वक्तव्य केलं होतं. मात्र धोनीने तोपर्यंत किती खेळाडूंना संधी दिली असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी धोनीवर टीका केली होती. अखेरीस ऋतुराज गायकवाडने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत लागोपाठ अर्धशतक झळकावत आपल्यातला स्पार्क सिद्ध केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 11:59 am

Web Title: csk vs kkr ruturaj gaikwad is one of the most talented players going around says ms dhoni nck 90
टॅग : IPL 2020
Next Stories
1 Video : चक्रवर्तीच्या जाळ्यात अकडला धोनी, दुसऱ्यांदा केली दांडी गुल
2 IPL 2020 : पंजाबचा विजयरथ राजस्थान रोखणार?
3 IPL 2020 : मराठमोळ्या ऋतुराजने दाखवला स्वतःतला ‘स्पार्क’, चेन्नईच्या विजयात उचलला मोलाचा वाटा
Just Now!
X