इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये अगदी विचित्र पद्धतीने राजस्थानचा फलंदाज डेव्हिड मिलर एक चेंडूही न खेळता धावबाद झाला. धाव पूर्ण करताना क्रिजमध्ये पोहचण्याच्या प्रयत्नात मिलरचे बॅट क्रिजवर आपटली मात्र बॅट पुढे सरकण्याऐवजी क्रिजवर अडकली आणि तो धावबाद झाला. यावरुनच भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने अशा मैदानांवर ही चूक करु नये असा सल्ला सर्व फलंदाजांना ट्विटवरुन दिला आहे.

सामन्याच्या तिसऱ्या षटकामध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल माघारी परतल्यानंतर संजू फलंदाजीसाठी आला. जोस बटरलच्या अनुपस्थितीत संजूला संघात स्थान देण्यात आल्याने तिसऱ्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला. त्यानंतर पुढील आठ षटकांमध्ये संजू आणि स्टीव्ह स्मिथने तुफान फलंदाजी करत १०० धावांची पार्टनरशीप केली. संजूने अवघ्या १९ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं. संजूने चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र उंचावरुन फटका मारण्याच्या नादात ३२ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी करुन लुंगी निगडीच्या गोलंदाजीवर दिपक चहारकडून झेलबाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिलरने चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. धाव पूर्ण करण्यासाठी क्रिजमध्ये जाताना मिलरने बॉट क्रिजपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅट पुढे सरकण्याऐवजी क्रिजवर अडकली आणि तो धावबाद झाला.

याचवर प्रतिक्रिया देताना सचिनने एक ट्विट केलं आहे. “मैदान टणक नसेल तर कधीच तुमची बॅट घासू नका. या मैदानाखाली वाळवंट आहे हे फलंदाजांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे,” असं सचिनने म्हटलं आहे. शारजाहमध्ये सुरु असणाऱ्या या सामन्याचे मैदान हे टणक असून तेथे बॅट घसणार नाही अशी आठवण या ट्विटमधून सचिचनने करुन दिली आहे.

या सामन्यामध्ये सुरुवातील चेन्नई पारडे जड वाटेल असं समजलं जातं होतं. मात्र राजस्थानने चांगली धावसंख्या उभारली.