इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक आठवडा शिल्लक आहे. सर्व संघाचा दुबई कसून सराव सुरु आहे. पाचव्या जेतेपदासाठी मुंबईचा संघ परिपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरत आहे. तयारी करत आहेत. या हंगामासाठी मुंबई संघानं अनेक नवीन खेळाडूंसोबत कारर केला आहे. यामध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या इतिहासात लसित मलिंगा (Lasith Malinga) पासून जसप्रीत बुमराहपर्यांत (Jasprit Bumrah) अनेक दिग्गज गोलंदाज आहेत. यामध्ये ट्रेंट बोल्ट याच्याही नावाचा समावेश झाला आहे.

ट्रेंट बोल्ट १२ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघात होता. लिलाव प्रक्रियामध्ये दिल्लीने बोल्टला मुंबईसोबत ट्रेड केलं होतं. बोल्ट मुंबईच्या संघासोबत जोडला आहे. १३ व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी तो नेटमध्ये कसून सराव करत असल्याचं दिसतेय. सरावात बोल्टने दमदार प्रदर्शन करत विरोध संघातील फलंदाजांना आव्हान केलं आहे. बोल्टने सराव करताना टाकलेल्या एका चेंडूमुळे स्टंप अर्ध्यातून तुटला आहे.

आणखी वाचा – IPL 2020 : अशी आहे मुंबईची पलटण, पाहा कोणकोण आहे संघात 

मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेसोबत सराव करताना बोल्टने शानदार गोलंदाजी केली अन् मिडल स्टंपचे दोन तुकडे केले. मुंबई संघानं बोल्टच्या या दमदार गोलंदाजीचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलेय की, ‘क्लीन बोल्ट, ट्रेंट येतोय.’

ट्रेंट बोल्टला या हंगामात लसित मलिंगाची साथ मिळणार नाही. मलिगांनं या हंगामातून माघार घेतली आहे. मुंबईमध्ये बोल्टशिवाय जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्कलेघनसारखे वेगवान गोलंदाज आहेत. यंदाच्या आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होत आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये पहिला सामना होत आहे.