News Flash

VIDEO: ‘सुपरमॅन’ धोनी! हवेतच घेतला दिल्लीच्या कर्णधाराचा झेल

श्रेयस अय्यरच्या बॅटला लागून चेंडू उडाला अन्...

Dream 11 IPL 2020: गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात आणि लगेचच दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभव अशी स्पर्धेची संमिश्र प्रकारची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ज संघाची झाली. तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी दिली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांनी दिल्लीला दमदार सलामी मिळवून दिली. धवन आणि पृथ्वी शॉ बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी चांगली खेळी केली पण धोनीने अप्रतिम झेल टिपत अय्यरला माघारी धाडलं.

राजस्थान विरूद्धच्या सामन्यात धोनीच्या खेळीवरून त्याच्यावर टीका करण्यात आली. त्याने केलेला संथ खेळ हा कायमच चर्चेचा मुद्दा राहिला. पण आज दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धोनीने आपली चपळाई पुन्हा एकदा दाखवून दिली. आधी त्याने पृथ्वी शॉ ला चपळाईने स्टंपिंग केलं. तर त्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याचा त्याने सुंदर झेल टिपला. सॅम करनच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बॅटची कड लागून चेंडू उडाला. त्यावेळी धोनी अक्षरक्ष: सुपरमॅनसारखी उडी मारून त्याचा झेल घेतला.

त्याआधी, पृथ्वी शॉ ची विकेट हा सामन्यातील चर्चेचा विषय ठरला. याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा वयाच्या चाळीशीत असलेल्या धोनीचं चपळ स्टंपिंग… १३व्या षटकात पियुष चावला गोलंदाजी करत होता. त्यावेळी दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉ ने पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू त्याच्या पायाला लागला आणि धोनीच्या दिशेने गेला. पृथ्वी शॉ ला काही कळण्याआधीच धोनीने चपळाई दाखवत स्मार्ट स्टंपिंग केलं आणि पृथ्वीला माघारी धाडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 9:17 pm

Web Title: ms dhoni superman catch video superb dive to depart shreyas iyer ipl 2020 csk vs dc vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 VIDEO: धोनीचं ‘स्मार्ट स्टंपिंग’! पृथ्वी शॉला काही कळण्याआधीच बेल्स हवेत
2 IPL 2020 : धोनीमध्ये आत्मविश्वासाची कमी, तो स्पर्धेसाठी तयार असल्याचं वाटत नाही !
3 IPL 2020 : चेन्नईची गाडी रुळावरुन घसरली, सलग दुसरा पराभव
Just Now!
X