24 January 2021

News Flash

घरगुती गॅस वापरताना

खोलीचे क्षेत्रफळ १० चौरस मीटर असल्यास दोन सिलेंडर ठेवण्यास हरकत नाही. दुसरा सिलेंडर बंद जागेत ठेऊ नये.

खोलीचे क्षेत्रफळ १० चौरस मीटर असल्यास दोन सिलेंडर ठेवण्यास हरकत नाही. दुसरा सिलेंडर बंद जागेत ठेऊ नये. अन्यथा एका खोलीत दोन सिलेंडर ठेऊ नयेत. तसेच तळाकडून आणि वरच्या बाजूने हवा खेळती राहील असे पाहावे.
० गॅस एजन्सीकडून जेव्हा सिलेंडर येतो तेव्हा त्यावरील एक्सपायरी डेट तपासून घ्यावी.
० पीएनजी गॅस हवेपेक्षा हलका असल्याने गळती झाली तर तो हवेत मिसळून जातो. परंतु एलपीजी गॅस हवेपेक्षा जड असल्याने तो घरात साठून राहातो. एलपीजी गॅस असल्यास घरात हवा खेळती असावी.
० सिलेंडर नेहमी सरळ उभा ठेवावा. आडवा पाडून ठेवू नये. एकदा सिलेंडर जागेवर ठेवल्यास सारखा आत-बाहेर खेचू नये.
० सिलेंडर कोरडय़ा आणि थंड जागी ठेवावा. शेगडी, स्टोव्ह, रॉकेलच्या डब्याजवळ ठेऊ नये.
० सिलेंडरच्या जवळपास हिटर, ओव्हन, फ्रिज यासारखी उष्णता निर्माण करणारी उपकरणे ठेऊ नयेत.
० विजेचे वायिरग, बटणे, प्लग पॉइंट यापासून सिलेंडरचे अप्लायन्स एक मीटर लांब असावे.
० स्वयंपाकाची गरम भांडी, तवा यांचा स्पर्श रबरी नळीला होणार नाही याची काळजी घ्यावी.
० स्वयंपाक करताना पदार्थ उतू जाऊन शेगडीच्या बर्नरवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी.
० अधूनमधून टुथब्रशच्या साह्य़ाने बर्नर साफ करावे. शेगडीच्या बटणाला खरकटे हात लावू नयेत. बटणाच्या भोवती चिकटपणा साचून गॅस चालू करणे किंवा बंद करणे यात अडथळा येतो. त्यामुळे वेळोवेळी बटण साफ करणे गरजेचे आहे.
० सिलेंडर आणि गॅस शेगडी यांना जोडणाऱ्या रबरी नळीवर चिरा दिसू लागल्यास ती एजन्सीच्या माणसाला सांगून ताबडतोब बदलावी.
० रेग्युलेटर नॉझल व अप्लायन्स नॉझल एकाच मापाची असल्याची खात्री डिलरकडून करून घ्यावी.
० रात्री काम संपल्यावर किंवा बाहेर जाताना सिलेंडरची कॅप फिरवून गॅस बंद करावा.
० गॅसवर काही काम करत नसताना जर गॅसचा वास येऊ लागला तर प्रथम खिडक्या व दारे उघडी करावी. शेगडीची बटणे बंद असल्याची खात्री करून घ्यावी. सिलेंडरची कॅप फिरवून गॅस बंद करावा. घरात निरांजन, मेणबत्ती पेटत असल्यात ती विझवावी. एजन्सीला त्वरीत फोन करुन दुरुस्ती करून घ्यावी.
० आगीसारखी भयानक घटना घडल्यास १०१ या टोल फ्री क्रमांकावर अग्निशमन दलाला फोन करावा. किंवा २३०६१११ या थेट क्रमांकावर अथवा २३०८५९९१९२/९४ या क्रमांकावर कंट्रोलरूमशी संपर्क करून आगीबाबत माहिती द्यावी.
० फोनवर तुमचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि जवळपासचे महत्त्वाचे ठिकाण आणि रस्त्याचे नाव सांगावे.
० तुमचा फोन झाल्याबरोबर पडताळणीसाठी अग्निशमन केंद्रातून उलट फोन येतो तो फोन त्वरित घेणे आवश्यक आहे.
तसा तो घेतला गेला नाही तर फेक कॉल म्हणून दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

 संकलन- उषा वसंत
unangare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2015 1:18 am

Web Title: tip to use cooking gas
Next Stories
1 घराचे व्यवस्थापन
2 सणासाठी खरेदी करताना
3 आनंदी राहण्यासाठी
Just Now!
X