शिक्षण हे विज्ञानाधिष्ठीत तसेच धर्मनिरपेक्षतेसारख्या आधुनिक मूल्यांवर आधारित असावे या घटनाप्रणीत मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने चक्क एका धार्मिक संस्थेच्या सहकार्याने ‘बीए – मूल्य आणि अध्यात्मिक शिक्षण’ असा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय असे या संस्थेचे नाव असून, या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ या वर्षीच होणार आहे.
मुक्त विद्यापीठ आणि ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारान्वये पहिल्या टप्प्यात ‘बी. ए. मूल्य आणि अध्यात्मिक शिक्षण’ हा नवीन शिक्षणक्रम सुरू करण्यात आला आहे. या शिक्षणक्रमाचे पहिले वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांस ‘पदविका’ आणि द्वितीय वर्ष पूर्ण करणाऱ्याला ‘प्रगत पदविका’ प्रदान करण्याचे नियोजन आहे.
या पदविकेतंर्गत पाच लेखी व एक प्रात्यक्षिक अशी एकूण ६०० गुणांची परीक्षा असेल. तीन वर्ष पूर्ण करणाऱ्याला ही पदवी मिळणार आहे. मात्र यातून एका विशिष्ट धर्माचा प्रचार होऊ शकतो. मुक्त विद्यापीठ धर्मशिक्षणाचे केंद्र बनू शकते, अशी साशंकता व्यक्त करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या शिक्षणक्रमावर आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, हा या शिक्षणक्रमाचा हेतू असून दोन महिन्याच्या अवधीत विद्यापीठ व अंनिस यांच्यामार्फत या शिक्षणक्रमाची पुन्हा एकवार तपासणी केली जाईल.
त्यानंतर विद्यापीठाची भूमिका स्पष्ट करता येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी स्पष्ट केले.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई