News Flash

यूपीएससी : पूर्वपरीक्षा सराव प्रश्नांची उत्तरे

मित्रांनो सामान्य अध्ययन पेपर - २ मधील इंग्रजी विषयाचे दोन उतारे आपण अभ्यासलेत त्यांची उत्तरे पुढे दिली आहेत़ पुढील आठवडय़ात आणखी काही उतारे आपण अभ्यासणार

| March 17, 2013 12:01 pm

मित्रांनो सामान्य अध्ययन पेपर – २ मधील इंग्रजी विषयाचे दोन उतारे आपण अभ्यासलेत त्यांची उत्तरे पुढे दिली आहेत़ पुढील आठवडय़ात आणखी काही उतारे आपण अभ्यासणार आहोत़
केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०११-२०१२ दरम्यान यूपीएससीच्या प्रश्नपत्रिकेत किमान १० परिच्छेद भाषा आकलनासाठी दिलेले आहेत़ २५० ते ३५० शब्दांच्या या उताऱ्यांवर तीन ते सहा प्रश्न विचारलेले असतात़ परीक्षा केवळ दोन तासांची असल्याने हा स्वाध्याय तुम्हाला अत्यंत वेगात संपवता आला पाहिज़े
परिच्छेदावरील प्रश्नांची उत्तरे शोधताना तुम्ही सर्वात अगोदर दिलेल्या उताऱ्यावरील प्रश्न वाचा़ त्यानंतर उताऱ्यावरून धावती नजर फिरवा व त्या प्रश्नांची संभावित उत्तरे प्रश्नपत्रिकेवर अधोरेखित करा़ दिलेला परिच्छेद पुन्हा एकदा एकाग्र होऊन लक्षपूर्वक संपूर्ण वाचा़ वाक्यातील एखाद्या ओळीचा, शब्दाचा अर्थ उमजत नसल्यास अडून राहू नका़ तुमच्यासाठी घडय़ाळातील प्रत्येक सेकंदाची वेळ महत्त्वाची आह़े अडणारी ओळ किंवा शब्द सोडून द्या़ वाचन सुरू ठेवा़ उताऱ्याचा भावार्थ तुमच्या ध्यानात येईलच़ पुन्हा त्या प्रश्नाकडे वळा आणि दिलेल्या चार पर्यायांतून अचूक उत्तराला रेखांकित करा़ तुमच्या वाचनाचा, आकलनाचा वेग जर अधिक असेल तर तुम्ही अत्यंत कमी वेळात प्रश्नांची नेमकी उत्तरे शोधू शकाल हे लक्षात ठेवा़ आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका अभ्यासल्यास तुमच्या लक्षात येईल की, पर्यावरण, बदलते अर्थकारण, भारतीय प्रशासन, समाजशास्त्र यांसारख्या विषयांवर सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेत उतारे दिलेले आहेत़ बदलणाऱ्या भोवतालाबद्दल उमेदवार सजग आहे किंवा नाही हे त्यातून तपासले जात़े या विषयांची स्वत:ची अशी शब्दावली आह़े ती ज्ञात करून घेण्यासाठी वरील विषयांच्या इंग्रजी परिच्छेदांचा जास्तीत जास्त सराव करावा़ तसेच वाचलेल्या भागाचा काही ओळीत सारांश लिहून काढण्याचा प्रयत्न करावा़ यामुळे तुमच्या बुद्धीला दिलेल्या उताऱ्यातील सत्त्व टिपून घ्यायची सवय लागेल.
दर्जेदार इंग्रजी असलेले किमान १० परिच्छेद दररोज अभ्यासावेत़ उद्याच्या लेखातील तुम्हाला सरावासाठी दिलेला उतारा-३ हा अमर्त्य सेन या विचारवंताच्या ‘‘इंडिया डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पार्टिसिपेशन’’ या भारतीय लोकशाहीवर भाष्य करणऱ्या मौलिक पुस्तकातून घेतलेला आह़े पर्यावरणाच्या संदर्भात न्यायालयीन क्रियाशीलतेच्या मर्यादा यात मांडलेल्या आहेत़ अशा प्रकारे दिलेल्या परिच्छेदात लेखकाला नेमके काय सांगायचे आहे, हे कळल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे तुम्हाला  सोडविता योणार नाहीत़ त्यामुळेच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वाचन, मनन आणि चिंतन या त्रयीला तुमच्या अभ्यासाचे सूत्र बनवा़ इंग्रजी भाषेला न घाबरता, उरअळ च्या प्रश्नपत्रिकेला सामोरे जा़ उतारा एक व दोनची उत्तरे पुढे दिली आहेत़
उतारा १
Q.1. Rural women are not involved in decision making process because?
b) Women are illitrate and have no technical knowledge about agriculture and are less mobile.
Q.2. Why rural women are not techno efficient?
a) Due to lack of education and restriction on free movement.
Q.3. Why men’s participation in women empowerment is important?
c) Because without it family harmony and true emancipation of women is impossible.
Q.4. Which is the best title for above para?
a) Women in decision making in agriculture
उतारा २
Q.1. Why did Indian leader oppose the British to write a constitution for India?
c) A democratic country needs constitution written by its own citizens.
Q.2. What was the dream of Indian freedom fighters?
b) To transform the country from a colony a democracy.
Q.3. What is exact meaning of word ‘Credentials’?
a) Qualification

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:01 pm

Web Title: upsc prelims gs question paper with answer
टॅग : Upsc
Next Stories
1 एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न – विषय- इतिहास
2 यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
3 एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
Just Now!
X