scorecardresearch

एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न

विषय : भूगोल प्र. ५८. चुकीचे विधान ओळखा. अ) उत्तर व दक्षिण गोलार्धात २५त् ते ३५त् अक्षवृत्तादरम्यान हवेचा जास्त दाबाचा पट्टा आहे. ब) विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे ५त् पर्यंत विषुववृत्तीय शांत पट्टा आढळतो. क) २५त् ते ३५त् उत्तर व दक्षिणदरम्यानच्या जास्त दाबाच्या पट्टय़ाला ‘अश्व अक्षांश’ असे म्हणतात. ड) उत्तर व दक्षिण गोलार्धातील २५त् ते ३५त् अंश अक्षवृत्तापासून ध्रुवाजवळ ६०त् ते ७०त् अंश उत्तरदक्षिणदरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणतात.

एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न

विषय : भूगोल
प्र. ५८. चुकीचे विधान ओळखा.
अ) उत्तर व दक्षिण गोलार्धात २५त् ते ३५त् अक्षवृत्तादरम्यान हवेचा जास्त दाबाचा पट्टा आहे.
ब) विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे ५त् पर्यंत विषुववृत्तीय शांत पट्टा आढळतो.
क) २५त् ते ३५त् उत्तर व दक्षिणदरम्यानच्या जास्त दाबाच्या पट्टय़ाला ‘अश्व अक्षांश’ असे म्हणतात.
ड) उत्तर व दक्षिण गोलार्धातील २५त् ते ३५त् अंश अक्षवृत्तापासून ध्रुवाजवळ ६०त् ते ७०त् अंश उत्तरदक्षिणदरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणतात.
प्र. ५९. भारतातील, नद्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम ओळखा.
पर्याय : अ) चिनाब, सतलज, रावी, झेलम
ब) सतलज, रावी, चिनाब, झेलम
क) रावी, सतलज, झेलम, चिनाब
ड) सतलज, चिनाब, रावी, झेलम
प्र. ६०. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
अ) विषुववृत्ताच्या ५त् अंश उत्तर व दक्षिणेकडील हवामान हे उष्ण व आद्र्र असते.
ब) या प्रदेशातील सरासरी तापमान २५त् सेल्सिअसइतके असते.
क) या प्रदेशात उन्हाळा व हिवाळा हे ऋतू नसतात.
ड) म्यानमार, आर्यलड, ऑस्ट्रेलिया या देशांत अशा प्रकारचे हवामान आढळते.
विषय : सर्वसमावेषक विकास व पर्यावरण साक्षरता
प्र. ६१. ‘हरितगृह परिणामा’च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
अ) जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात कार्बन डायऑक्साइड या वायूचा वाटा सर्वाधिक आहे.
ब) जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात सर्वात कमी वाटा नायट्रस ऑक्साइड या वायूचा आहे.
क) जागतिक तापमानवाढीचा एक महत्त्वाचा निर्देशक अंटाक्र्टिका खंडावरील बर्फाची व्याप्ती हा आहे.
ड) हरितगृह वायूमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे तापमान सजीवांना अनुकूल असे राहते.
पर्याय : १) फक्त अ २) अ, ब, क
३) अ, क ४) अ, ब, क, ड.
प्र. ६२. विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
अ) १८८३ मध्ये मुंबई येथे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना झाली.
ब) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही वन्यजीवांना संरक्षण देण्यासाठी स्थापन केलेली पहिली शासकीय संस्था ठरते.
पर्याय : १) विधान ‘अ’ बरोबर
२) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चूक
३) विधान ‘ब’ बरोबर
४) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
प्र. ६३. विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
अ) अणुऊर्जेला स्वच्छ ऊर्जा (Clean energy) मानले जाते.
ब) अणू कचऱ्यात (न्यूक्लिअर वेस्ट) असणारी ट्रान्स युरेनिक मूलद्रव्ये ‘मानवी आरोग्यास दीर्घकाळ धोका उत्पन्न करू
शकतात.
पर्याय : १) विधान ‘अ’ बरोबर
२) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चूक
३) विधान ‘ब’ बरोबर
४) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
टीप : प्रश्न ५३ मध्ये शौर्याचा याऐवजी ध्येयांचा असे वाचावे.
(क्रमश:)
– प्रवीण जा़ भोरे
भूगोल या घटकाचा अभ्यास करताना Geography Through Maps, Atlas (महाराष्ट्र, भारत व जग) या पुस्तकांचा अभ्यास अवश्य करावा़

यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
सामान्य अध्ययन- १
विषय : इतिहास
प्र. १६. ‘फ्रान्स’मध्ये जसे फ्रेंच राज्यक्रांतीचे स्थान आहे; रशियात असे रशियन राज्यक्रांतीचे स्थान आहे; तसे १९४२ च्या क्रांतीचे हिंदुस्थानच्या इतिहासात स्थान आहे. जगातील कोणत्याही क्रांतीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जनतेने भाग घेतलेला नाही. १९४२ च्या आंदोलनाच्या संदर्भात वरील उद्गार कोणत्या नेत्याने काढले होते?
पर्याय : अ) पंडित जवाहरलाल नेहरू ब) जयप्रकाश नारायण क) डॉ. राजेंद्र प्रसाद ड) युसूफ मेहरअली
प्र. १७. कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) त्रिमंत्री योजनेनुसार मुसलमान व शीख सोडून इतर जातीय मतदार संघ रद्द करण्यात आले.
ब) त्रिमंत्री योजनेनुसार प्रांतांचे तीन गट करण्यात आले.
क) संस्थानांना स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला होता.
ड) प्रथम केंद्राची घटना व नंतर प्रांतांची तयार करण्यात येणार होती.
प्र. १८. ‘सुफी’ संप्रदायाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) सुफी संप्रदायाने महंमदाचे प्रेषितत्व व कुराणाचे श्रेष्ठत्व नाकारले होते.
ब) सुफी संप्रदायाने काळाच्या ओघात ख्रिश्चन, हिंदू, झोराष्ट्रीयन, बौद्ध धर्मातील तत्त्वांचा स्वीकार केला होता.
क) वहादत-उल-वजूद हे सूफी संप्रदायाचे प्रमुख तत्त्व होते.
ड) भारतात सूफी संप्रदायातील ‘चिस्ती’ व ‘सुधारवादी’ हे दोन पंथच प्रसिद्ध झाले.
प्र. १९. समुद्रगुप्तासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
अ) समुद्रगुप्ताचा उल्लेख ‘अनुकंपाबान’ असा केला जात असे.
ब) समुद्रगुप्ताने सिलोनचा बौद्ध राजा मेघवर्मन याला बोधगया येथे स्तूप बांधण्याची परवानगी दिली होती.
पर्याय : १) फक्त अ २) अ व ब दोन्ही बरोबर ३) फक्त ब ४) अ व ब दोन्ही चूक.
प्र. २०. खालीलपैकी कोणते विधान/ विधाने जैन धर्मासंबंधी बरोबर आहेत?
अ) जैन धर्माने सुरुवातीच्या काळात प्राकृत भाषेत धर्मप्रसाराचे कार्य केले.
ब) सुरुवातीच्या काळात जैन धर्मग्रंथाचे लेखन प्रामुख्याने अर्धमागधी भाषेत झाले होते.
क) मध्ययुगाच्या सुरुवातीस जैन धर्माने संस्कृत भाषेचा स्वीकार केलेला दिसतो.
ड) प्राचीन काळात जैन कला ही बौद्ध कलेपेक्षा समृद्ध होती.
पर्याय : (१) अ, ब, क (२) अ, ब, ड (३) ब, ड (४) अ, ड
प्र. २१. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी प्रयत्न केले होते.
ब) १८४९ साली कलकत्ता येथे मुलींच्या शिक्षणासाठी बेथ्यून स्कूलची स्थापना केली होती.
क) बहुपत्नीत्व प्रथेविरोधी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आंदोलन उभारले होते.
ड) संमतीवय विधेयकाच्या समर्थनासाठी विद्यासागर यांनी कलकत्ता येथे आंदोलन उभारले होते.
प्र. २२. चुकीचे विधान ओळखा.
अ) मुस्लीम लीगने द्विराष्ट्र सिद्धान्ताची घोषणा १९४० च्या लाहोर अधिवेशनात केली.
ब) १९४१ च्या लीगच्या मद्रास अधिवेशनात ‘जमात- उलउलेमा- ए- हिंद’ या संघटनेने पाकिस्तानच्या मागणीला विरोध केला होता.
क) खुदाई खिदमतगार व मजलिस उल- अहरार- ए- हिंद या संघटनांनी पाकिस्तानच्या मागणीस विरोध केला होता.
ड) १९४० च्या लाहोर अधिवेशनात जिना यांनी ‘मुस्लीम व हिंदू’ हे धर्म नसून दोन भिन्न सामाजिक व्यवस्था आहेत, असे उद्गार काढले होते.
प्र. २३. ‘एक धर्म, एक जात, एक ईश्वर’ ही घोषणा खालीलपैकी कोणी केली होती?
पर्याय : अ) श्री नारायण गुरू
ब) रामस्वामी वारियार
क) दयानंद सरस्वती
ड) विवेकानंद
(क्रमश:)
– शिल्पा अ़ कांबळे

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2013 at 12:30 IST

संबंधित बातम्या