23 February 2020

News Flash

शिवसैनिकांकडून आशिष शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या एनआरसी संदर्भातील वक्तव्यावर शेलार यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला.

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्याप्रतिकात्मक पुतळ्याचे दहन इचलकरंजी व कुरुंदवाड येथे शिवसैनिकांनी मंगळवारी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या एनआरसी संदर्भातील वक्तव्यावर शेलार यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्याने शिवसैनिकांतून तीव्र संताप्त व्यक्त होत आहे.

त्याच अनुषंगाने इचलकरंजी शहर शिवसेनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे  जोरदार निदर्शने करून शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शहरप्रमुख सयाजी चव्हाण, तालुकाप्रमुख आनंद शेट्टी,  माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे, उपशहरप्रमुख राजू आरगे यांनी निषेध नोंदवला.

कुरुंदवाड येथे शिवसेनेच्यावतीने जोडे मारून शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. भालचंद्र थिएटर चौकामध्ये शिवसैनिकांनी शेलार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. जिल्हा शिवसेना उपप्रमुख मधुकर पाटील, कुरुंदवाड  शहर प्रमुख राजू आवळे, माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, शिवसेना वाहतूक सेना तालुका अध्यक्ष सुनील जुगळे आदी सहभागी झाले होते.

First Published on February 5, 2020 2:37 am

Web Title: shiv sena burns a symbolic statue of ashish shelar zws 70
Next Stories
1 खंडपीठ मागणीसाठी कोल्हापुरात वकिलांचे धरणे आंदोलन
2 Budget 2020 : ‘टेक्निकल टेक्स्टाईल’ला प्रोत्साहन; पण सामान्य यंत्रमागधारकांची निराशा
3 कोल्हापूर महापालिकेने जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घेण्याची मागणी
Just Now!
X