News Flash

कोल्हापुरात ‘ब्राह्मणी बदक’चे दर्शन!

ह्या पक्ष्याची नोंद करून त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात पक्षी अभ्यासकांना ‘ब्राह्मणी बदक’ (रुडी शेलडक/ टॅडोर्ना फेरुजीनिया) हा स्थलांतरित पक्षी आढळला आहे. अलीकडच्या काळात प्रथमच हा पक्षी विद्यापीठ परिसरात आढळल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. उद्या शनिवारी (९ मे) साजऱ्या होणाऱ्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राणिशास्त्र अधिविभागाकडून ही माहिती आज देण्यात आली आहे.

प्राणिशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. सुनील एम. गायकवाड विद्यापीठ परिसरातील पृष्ठवंशीय प्राण्यांवर काम करीत आहेत.

‘ब्राह्मणी बदक’ (रुडी शेलडक) हा स्थलांतरित पक्षी त्यांना सर्वप्रथम ७ मार्च रोजी वि.स. खांडेकर भाषा भवनच्या पिछाडीस असलेल्या तलावामध्ये आढळला. ह्या पक्ष्याची नोंद करून त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली आहेत. यावरून विद्यापीठ परिसरातील पाणवठे जैवविविधतेसाठी अत्यंत पोषक असून शिवाजी विद्यापीठ जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या कामी योगदान देत असल्याचे अधोरेखित होते.

भारतातील अनेक स्थलांतरित पक्ष्यांपैकी ‘रुडी शेलडक’ (टॅडोर्ना फेरुजीनिया) असून त्याला भारतात ‘ब्राह्मणी बदक’ म्हणूनही ओळखतात. पक्ष्याची लांबी २३ ते २८ इंच व वजन साधारण सव्वा किलो असते. याचे डोके फिकट गुलाबी असून पिसे नारंगी—तपकिरी रंगाची तर शेपटीकडील पिसे काळी असतात. भारतीय उपखंडात हिवाळ्यात आगमन करतो आणि एप्रिलमध्ये परत जातो. हा सुमारे २६०० कि.मी. प्रवास करू शकतो आणि जवळपास ६ हजार मीटर उंचीवर पोचू शकतो. जम्मू—काश्मीरमधील अति उंचीवरील तलावात आणि दलदलीमध्ये ते प्रजनन करतात. हा बदक मुख्यत: तलाव, जलाशय आणि नद्यांसारख्या पाणथळ जागी राहतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:11 am

Web Title: sight of brahmani duck in kolhapur abn 97
Next Stories
1 महापुराचा धोका टाळण्यासाठी कोल्हापुरात उपाययोजना
2 ‘त्या’ ट्विटवरून देवेंद्र फडणवीसांविरोधात शाहूप्रेमी जनतेमध्ये संताप
3 अतिरिक्त दूध खरेदीच्या निर्णयाने फटका
Just Now!
X