कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक मिरवणुकीची सांगता आणि कोल्हापुरात चपलांचे जागोजागी पडलेली ढीग असे नवे चित्र गेल्या काही वर्षात कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. आज विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर हेच दृश्य पुन्हा कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. यावर्षीच्या मिरवणुकीची सांगता झाली २५ तासानंतर सांगता झाली. तेव्हा शहरात दहा ट्रॅक्टर चपलांचा ढीग पडल्याचे दिसून आले. आरोग्य विभागाच्या वतीने त्याचा तातडीने उठाव करण्यात आला.

कोल्हापूर शहरात गणेशोत्सव वाजत गाजत साजरा केला जातो. त्याची विसर्जन मिरवणूक ही तितक्याच दणक्यात निघते. यंदा कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच पाठबळ मिळालेले होते. इराणीखणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १५६१ तर घरगुती मंडळाच्या लहान १२०३ गणेश मूर्तींचे पर्यावरण विसर्जन करण्यात आले. सुमारे २५ तासाहून अधिक काळ ही मिरवणूक सुरू होती. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कोल्हापूर महापालिकेचा आरोग्य विभाग, धर्माधिकारी प्रतिष्ठान व अवनी संस्थेकडून विसर्जनाच्या ठिकाणी ३५ टन निर्माण संकलित करण्यात आले. ते १० डंपरद्वारे खत प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात आले. परंतु याचवेळी मिरवणूक मार्गावर वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. गेल्या दोन-तीन वर्षाप्रमाणे याही वेळी मिरवणूक मार्गावर चपलांचा अक्षरशः खच पडलेला होता.

शहरातील मिरवणूक संपल्यानंतर तातडीने महापालिकेच्यावतीने मुख्य मिरवणूक मार्गाची साफसफाई करण्यात आली. यामध्ये बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वारोड, पापाची तिकटी, बिन खांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, गंगावेश, रंकाळा वेश, रंकाळा टॉवर, जुना वाशी नाका व इराणी खण या मुख्य रोडवरीलवरील दहा ट्रॉली पेक्षा जास्त चपलांचा ढिग व इतर कचरा युद्धपातळीवर आरोग्य विभागाच्या वतीने उठाव करण्यात आला. गतवर्षी हेच दृश्य गेल्यावर्षी विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही शहरातील महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, इराणी खन या परिसरात पाच ट्रॉली पेक्षा अधिक चपलांचा अधिक आढळला होता.

करोनानंतर काय ती गर्दी; काय तो चपलांचा ढीग तर २०२२ मध्ये यंदा करोनाचे सावट दूर झाल्याने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. गणेश विसर्जनाच्या दिवशी तर ठिकठिकाणी नागरिकांनी वाजत-गायत मिरवणूक काढली. यादिवशी कोल्हापूरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. याचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. विसर्जन मिरवणूक पार पडल्यावर रस्त्यांची स्वच्छता करीत असताना ठिकठिकाणी चपलांचा खच पडलेला होता. या विसर्जन मिरवणुकीत तब्बल पाच डंपर चपलांचा खच जमा करण्यात आला होता. काय ती गर्दी काय तो चपलांचा ढीग आणि आता रस्ता एकदम ओके मध्ये असच महाद्वार रोड बाबत म्हणण्याची वेळ आली होती. 

तेव्हाही चपलांचा खच

सन २०२३मध्ये जुलै महिन्यात झालेल्या दोन गटातील तुंबळ वादावेळीही कोल्हापुरात चपलांचा खच पाहायला मिळालेला होता. तेव्हा समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर ठेवलेल्या तरुणांना त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनानी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलकांना मोठा प्रतिसाद मिळाल्याने हजारो लोकांची गर्दी झाली होती. याचवेळी समाज कंटकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीमार करीत, अश्रुधूराचा मारा करीत जमावाला काबूत आणले होते. परतणाऱ्या जमावाने दुकाने, वाहने यांची मोठी नासधूस केली. होती. पांगणारा जमाव प्रार्थनास्थळ जवळच असलेल्या महापालिका चौक परिसरामध्ये आल्याने तणावाचे वातावरण झाले होते. येथे अनेक वाहनांची मोडतोड करण्यात आली. महाद्वार रोड, चप्पल लाईनला असलेल्या दुकानांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली होती. माराच्या भीतीने पळून जाणाऱ्या लोकांच्या चपलांचा अक्षरश: खच रस्त्यावर पडलेला होता. महापालिका कर्मचार्यांनी भर उन्हात विशेष मोहीम राबवून चपला गोळा करून रस्ता , परिसर स्वच्छ ठेवला होता.