कोल्हापूर : पहेलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानसोबत व्यापार, पाणी, विमान, जहाज वाहतूक बंद करून पुढचे पाऊल टाकले. त्यानंतर आशिया कप क्रिकेट खेळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय साध्य केले, असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला. क्रिकेट न खेळता जगाला एक वेगळा संदेश देता आला असता, पण आपण तो गमावून बसलो.
नेते क्रिकेटची तुलना सैन्यांसोबत का करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान इचलकरंजी, कोल्हापूर, आजरा व कुरूंदवाड या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संविधानाने प्रत्येकाला धर्माप्रमाणे पूजा-अर्चा करण्याचा अधिकार आहे. त्याला काही मंडळी राजकारणासाठी विरोध करीत आहेत. पैगंबर मोहम्मद यांच्या बॅनरवरून विरोध केला जात आहे. त्यामध्ये जाती समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मंडळीविरोधात एकत्र आले पाहिजे.
ऑल इंडिया मजलीस- ए- इत्तेहाद- ऊल- मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्यावतीने इचलकरंजी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओवैसी बोलत होते. ओवैसी यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. हा संदर्भ घेत ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज व महात्मा जोतिबा फुले यांच्या भूमीत येण्यासाठी कोणी कोणालाही अडवू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आपले विचार मी संपूर्ण देशात कोठेही मांडू शकतो.
पहेलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानसोबत व्यापार, पाणी, विमान, जहाज वाहतूक बंद करून पुढचे पाऊल टाकले. त्यानंतर आशिया कप क्रिकेट खेळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय साध्य केले. क्रिकेट न खेळता जगाला एक वेगळा संदेश देता आला असता, पण आपण तो गमावून बसलो. नेते क्रिकेटची तुलना सैन्यांसोबत का करीत आहेत, अशी टीकाही ओवैसी यांनी केली.
निवडणूक स्वबळावर
इचलकरंजी, कोल्हापूर, आजरा व कुरूंदवाड या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची त्यांनी घोषणा केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संविधानाने प्रत्येकाला धर्माप्रमाणे पूजा-अर्चा करण्याचा अधिकार आहे. त्याला काही मंडळी राजकारणासाठी विरोध करीत आहेत. पैगंबर मोहम्मद यांच्या बॅनरवरून विरोध केला जात आहे. त्यामध्ये जाती समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मंडळीविरोधात एकत्र आले पाहिजे.