कोल्हापूर : दिशा सलियन मृत्यू प्रकरणाचा उलगडा ७ मार्चनंतर होईल. या गुन्ह्यांमध्ये कोणाचा सहभाग होईल ते लवकरच स्पष्ट होईल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.

अभिनेता सुशांत सिंग याची पूर्वाश्रमीची स्वीय सहायक दिशा सलियन हिच्या मृत्यू प्रकरणात कोणाचा सहभाग आहे यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आमदार नीतेश राणे यांनी दिशा मृत्यू प्रकरण आणि मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाजे याचा काही संबंध आहे का, याबाबत विचारणा केली आहे. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या कुटुंबीयांची आज भेट घेतल्यानंतर या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हंटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच मुद्दय़ाकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले की, याबाबत भाजपचे कसलेही राजकारण नाही. या प्रकरणातील पुरावे आता  समोर येऊ लागले आहेत. सात तारखेपर्यंत  पूर्णपणे उलगडा होणार आहे. हे प्रकरण पुढे येऊ नये यासाठी काहींची धडपड सुरू होती, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.