सहकारी डॉक्टर तरुणीचे मोबाइलद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी सीपीआरमधील डॉ. पनीकुमार किरण कोटा याची बुधवारी वैद्यकीय वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली. कोटा याच्यावर दाखल केलेल्या दोषारोपपत्रासह महिला लंगिक अत्याचार प्रतिबंध समितीचा अहवाल दिल्ली येथील वैद्यकीय खात्यास पाठविण्यात आला आहे.
डॉ. पनीकुमार व संबंधित डॉक्टर तरुणी परिचयाचे असून दोघेही सीपीआरमधील तुळशी बिल्िंडगच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात. ८ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही तरुणी खोलीबाहेर काहीतरी आवाज झाल्याने बाहेर आली. त्या वेळी पनीकुमार त्या खोलीबाहेर फिरताना आढळून आला. तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र संबंधित तरुणी रूममध्ये परतल्यानंतर दरवाजाच्या वरील बाजूस मोबाइल असल्याचे दिसून आले. तरुणीने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची तक्रार दिली होती. चौकशीअंती पनीकुमार कोटा याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, महिला लिगक प्रतिबंध समितीच्या वतीने संबंधित युवतीचा जबाब घेऊन त्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सादर केला जाणार होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत डॉ. कोटा याला महाविद्यालयाच्या वसतिगृहातून बाहेर काढले होते.