कोल्हापूर : लंम्पि चार्मारोगाबाबत शासन स्तरावर संबंधित विभागास  योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना तात्काळ देण्यात येतील, असे आश्वसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी ‘गोकुळने’ राज्याबाहेरही व्याप्ती वाढवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आज मुख्‍यमंञी शिंदे यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी लंम्पी आजरासंदर्भात व  गोकुळच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन दिले असता ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी इर्शाळवाडी  गावाला  दुर्घटनेवेळी तत्परतेने सरकारने मदत केल्याबद्दल संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी आमदार चंद्रदीप नरके, संचालक अजित नरके,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील,प्रवीण डोंगळे उपस्थित होते.

हेही वाचा >>> इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात शिरोळ तालुक्यातील पाच गावात शुक्रवारी बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोकुळ संघामार्फत कोल्हापूर जिल्हयातील जनावरांना मोफत व अल्प दराने औषधोपचार केले जातात. सध्या लम्पी आजार वाढत असून दूध उत्पादनाचे प्रमाण घटत आहे. गोकुळ मार्फत बाधीत जनावरांवर उपचार चालू असून त्यासाठी शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी  डोंगळे यांनी  केली. प्रलंबित प्रस्तावाची माहिती संबधित विभागाकडून घेऊन ते मंजुर करण्‍याचे आश्‍वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.