कोल्हापूर : डुकरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पन्हाळा तालुक्यातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार भर दिवाळीत उघडकीस आला आहे. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४ ) व नायकू सदाशिव कुंभार (वय ६०, रा. राक्षी ) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली असली तरी आज ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी शिकारीसाठी तारा लावून मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या सहा संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; वाहने पेटवली, धक्काबुक्कीचा प्रकार

जोतिराम व नायकू हे दोघे भाऊ बुधवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी धरणाचा ओढा भागात गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता. अगदी ड्रोनद्वारे शोध घेऊनही ते कोठे आढळले नव्हते. त्यावर कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची फिर्याद पन्हाळा पोलिसांमध्ये दिली होती. दरम्यान धरणाचा ओढा परिसरात गावातील काही लोकांनी डुकराच्या शिकारीसाठी विद्युत तारा लावल्या आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे तपास सुरू केला तेव्हा दोघा कुंभार बंधूंचा या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली.

हेही वाचा : राजू शेट्टी तुमच्या दूध संघाचा दर वाढवा; कोणतीच निवडणूक लढवणार नाही- राहुल आवाडे यांचे प्रतिआव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे शिकारीसाठी तारा लावणाऱ्या सहा जणांनी कारवाई होण्याच्या भीतीने कुंभार बंधूंचे मृतदेह जंगलात फेकले असल्याची माहिती मिळाली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. ऐन दिवाळीत ही हृदयद्रावक घटना घडली असून राक्षी येथील नागरिकांनी पन्हाळा पोलीस ठाण्यासमोर एकच गर्दी केली आहे.