कोल्हापूर : कागल येथील शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी एस.बी. रिशेलर्स या कोल्हापूर मधील स्थानिक कंपनीने विकसित केलेल्या ऊस तोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक झाले. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञान अवलंबण्यास नेहमीच प्राधान्य दिले. त्यामध्ये आम्ही आणखी भर घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर अंतर्गत स्थानिक उद्योजकांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानास प्रोत्साहन देत आहोत. स्थानिक व्यावसायिक व उद्योजक यांच्या नवतंत्रज्ञानास आमचे नेहमीच प्रोत्साहन राहील. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी.पाटील, पियुष झाला, नितीश चौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ तलाठी,महसूल सहाय्यक जाळ्यात

पाचटाचे प्रमाण कमी

घाटगे पुढे म्हणाले, स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी पंधरा वर्षांपूर्वी राज्यात सर्वप्रथम ऊस तोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक शाहू साखर कारखाना कार्यक्षेत्रात घेतले होते. आता कारखान्याकडे पंधराहून अधिक ऊस तोडणी यंत्रे यशस्वीपणे कार्यरत आहेत. आता या यंत्रांमधील त्रुटी दूर करून ती अद्यावत केली आहेत. जुन्या यंत्रांच्या तुलनेत या यंत्रांची कार्यक्षमता वाढवून मेंटेनन्स खर्च कमी केला आहे. तर कारखान्यांच्यादृष्टीने उसाच्या उताऱ्यावर परिणाम करणाऱ्या पाचटाचे प्रमाण कमी येत असल्यामुळे कारखाना पर्यायाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा : अखेर अंशतः अनुदानित शिक्षकांचा १०वी व १२वी च्या बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार

यांत्रिक तोडणी अपरिहार्य

ऊस तोडणी मजुरांकडून होणारी फसवणूक व त्यांच्या टंचाईमुळे कारखान्यांना गाळप क्षमते इतका ऊस पुरवठा होण्यामध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे आता यांत्रिक ऊस तोडणीशिवाय पर्याय नाही. हा बदल आता शेतकऱ्यांनी व कारखानदारांनी स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही, असे मत घाटगे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : कोल्हापूर: अंबाबाई मूर्तीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश

कार्यक्षमता अधिक

एस.बी. रिशेलर्स कंपनीचे सचिन कुटे म्हणाले, सध्या कार्यरत असणाऱ्या ऊस तोडणी यंत्रांच्या तुलनेत या यंत्राची कार्यक्षमता अधिक असून इंधन व देखभाल दुरुस्ती खर्च कमी आहे. कोल्हापूरमध्ये तयार झालेले हे यंत्र कोल्हापूरकरांना फायदेशीर ठरल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, वाहनधारक व परिसरातील विविध कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. आभार संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांनी मानले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur demonstration of sugarcane harvester machine at shahu factory plot css
First published on: 27-02-2024 at 13:44 IST