सांगली : कुपवाडजवळील बामणोलीमध्ये सुरु असलेल्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी शनिवारी धाड टाकून सुगंधी तंबाखू, सुपारी, यंत्र असा २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कारखान्यात काम करत असलेल्या परप्रांतीय ७ जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये दोन मुलांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
prakash ambedkar pratik patil vishal patil
सांगलीचं गणित बिघडणार? प्रकाश आंबेडकर मैदानात; प्रतीक पाटलांच्या भेटीनंतर मोठं वक्तव्य, म्हणाले, “विशाल पाटील जर…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा…..तर २०१९ मध्ये सुनील तटकरे राजकारणातून हद्दपार झाले असते, शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा दावा

दत्तनगर, बामनोली येथे पत्र्याचे शेडमध्ये गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे दत्तनगर बामनोली परिसरात एक शेडमध्ये गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असल्याचा संशय आल्याने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पत्र्याचे शेडवर छापा टाकला असता, सदर ठिकाणी सुगंधी तंबाखु व गुटखा तयार करणासाठी लागणारा कच्चा माल व मशीनरी मिळून आल्या.

यामध्ये १२,७६,८०० रु. किंमतीची ३१.९२ किलो सुगंधी तंबाखू, ३ लाखाच्या ३ मटेरियल पॅकिंग मशीन, १ लाख ८० हजाराची ४५ किलो वजनाची सुट्टी गुटखा सुपारी, २४ हजाराची २४ किलो सुट्टी सुंगधी तंबाखु, ८३ हजाराचा माणिकचंद गुटखा, ६० हजाराचे पॅकिंग पेपर बंडल, ५२ हजार ६०० रुपयांची पॅकिंगच्या बॉक्सची १६ पोती असा १९ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा…सांगलीचं गणित बिघडणार? प्रकाश आंबेडकर मैदानात; प्रतीक पाटलांच्या भेटीनंतर मोठं वक्तव्य, म्हणाले, “विशाल पाटील जर…”

शेडवर काम करणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सर्वजण सिकंदरा आग्रा, उत्तरप्रदेशमधील आहेत. त्यांची नावे योगेदंर रामब्रिज सिंह (वय ३० वर्षे), द्रुक गंगा सिंह, (वय २४ वर्षे), मोनु रामबहादुर सिंह (वय ३० वर्षे), हरीओम पुन्ना सिंह, देव बमर सिंह (वय २२ वर्षे) आणि २ बालअपचारी आहेत.

हेही वाचा…सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा

सदर कारखान्यात गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असून सदरचा कारखाना हा शहाणवाज पठाण (रा. अहिल्यानगर, कुपवाड) हा चालवित असल्याची कामगारानी कबूली दिली. याबाबत एम. आय. डी. सी.कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.