कोल्हापूर : राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेना एकत्र आहे. कोणी कुठे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तीन राज्यांतील निवडणुकांमुळे भाजपला यशाचा आत्मविश्वास असेल तर त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षात फोडाफोडी करण्याची गरज का भासते?, असा प्रतिप्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी शनिवारी येथे केला. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे महा रॅलीचे आयोजन केले आहे. २८ तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज जिल्हा काँग्रेस भवनात पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी तीन हजार कार्यकर्ते नागपूरला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी पी. एन. पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, राजू आवळे या आमदारांसह शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला अध्यक्ष सुप्रिया साळुंखे, बाजीराव खाडे, संजय पवार वाईकर, सूर्यकांत पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यानंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपकडे आत्मविश्वास नसल्याने ते विरोधी पक्षांची फोडाफोड करत आहेत. तरीही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच सर्वाधिक संख्येने निवडून येईल.

हेही वाचा : मुंबईहून आलेली व्यक्ती कोल्हापुरात करोनाबाधित; यंत्रणा सतर्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक मतदारसंघ काँग्रेसला

कोल्हापूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी त्यातील कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी एक मतदारसंघ काँग्रेसकडे देण्यासंदर्भात मागणी केली आहे. याबाबत २९ डिसेंबरला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकतो, असेही पाटील म्हणाले.