scorecardresearch

“…तर मी कोणतीही निवडणूक लढणार नाही”, सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिलं थेट आव्हान

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण महायुतीकडून निवडणूक लढवणार आहे. यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.

sadabhau khot on contesting election, sadabhau khot on raju shetty protest
"…तर मी कोणतीही निवडणूक लढणार नाही", सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिलं थेट आव्हान (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मागील वर्षाच्या ऊसाला प्रति टन ४०० रुपये अधिक आणि यावर्षीच्या हंगामासाठी प्रति टन एक रकमी ३,५०० रुपये दराची मागणी केली आहे. त्यांनी हा दर मिळवून दिला तर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि मागणीप्रमाणे जर शेट्टी कृती करू शकले नाहीत तर त्यांनी निवडणूक लढवू नये, असे जाहीर आव्हान आज शेट्टी यांचे कट्टर विरोधक, माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक या नात्याने सदाभाऊ खोत यांनी यावर्षीच्या ऊसाला ३,२५० रुपये मिळाल्यास कारखाने सुरू करण्यास मदत करणार असल्याचेही जाहीर करत एका परीने शेट्टी यांना आव्हान दिले. या आंदोलनात मराठा महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक सुरेश दादा पाटील व कुरुंदवाडचे भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.

Jyotiraditya-Scindia-and-Yashodhara-Raje-Scindia
एका सिंदियामुळे दुसऱ्या सिंदियाला फायदा? यशोधरा राजे यांची निवडणुकीतून माघार, भाजपामध्ये खळबळ
Yavatmal-Washim Lok Sabha constituency
शिंदे गटासाठी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ अडचणीचा ठरणार! भाजपसंबंधित खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
sudhir Mungantiwar Lok Sabha
“पक्ष नेतृत्वाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा,” चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मुनगंटीवार काय म्हणाले? वाचा…
MNS MLA Raju Patil
“कल्याण लोकसभेची वाटचाल भाजपा उमेदवाराच्या दिशेने”, मनसे आमदार राजू पाटलांचं सूचक वक्तव्य

हेही वाचा : कोल्हापूरमध्ये बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आप्तस्वकियांनीच दंड थोपटले

शेट्टींना शह

राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या बाबत झालेल्या तीन बैठकांमध्ये निर्णय झालेला नाही. आता शेट्टी यांनी आंदोलन आणखी तापवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी आज ऊस दरासाठी ३,२५० रुपये प्रति टन असा नवा पर्याय सुचवत शेट्टी यांना शह दिला आहे. कोणत्याही आंदोलनामध्ये कोठे थांबायचे, हे समजले पाहिजे. यासाठी रामचंद्र डांगे हे साखर कारखानदारांशी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ऊस वाळत असल्याने शेतकरीही अडचणीत सापडलेला आहे, असेही खोत म्हणाले.

हेही वाचा : कोल्हापुरात क्रिकेटचा ज्वर शिगेला; क्रिकेटपटूचे फलक, बेटिंग, निळ्या गणवेशाचे वातावरण

लोकसभेसाठी उमेदवार

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण महायुतीकडून निवडणूक लढवणार आहे. यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In kolhapur sadabhau khot told that he will not contest election if raju shetty gets the desired price for sugarcane css

First published on: 20-11-2023 at 16:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×