scorecardresearch

कोल्हापुरात क्रिकेटचा ज्वर शिगेला; क्रिकेटपटूचे फलक, बेटिंग, निळ्या गणवेशाचे वातावरण

आवडत्या क्रिकेटपटुंचे मोठे मोठे फलक लावण्यात आले आहेत. कोल्हापूर हे क्रीडाप्रेमींचे शहर म्हणून ओळखले जाते.

kolhapur, icc world cup, final match
विराट कोहलीचे भले मोठे पोस्टर राणा स्पोर्ट्सने उभे केले आहे. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कोल्हापूर : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रविवारी होत असताना कोल्हापुरात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. आवडत्या क्रिकेटपटुंचे मोठे मोठे फलक लावण्यात आले आहेत. कोल्हापूर हे क्रीडाप्रेमींचे शहर म्हणून ओळखले जाते. कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट यांसह सर्व प्रकारच्या खेळांचे दर्दी आणि खेळाडू हे घरोघरी आढळतात. अंतिम सामना यजमान भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असताना कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह आवडत्या खेळाडूंचे मोठमोठे फलक शहरात लावण्यात आले आहेत. उद्या कोल्हापूरकरांचे सगळे लक्ष सामन्याकडे असेल, असे कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे सचिव केदार घायवळ यांनी सांगितले.

हेही वाचा : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा “लेझर शो” झळाळणार

gondia young girl and boys, practice of dandiya, practice of dandiya ras garba
दांडियाच्या सरावात रमली तरुणाई, विविध नृत्य प्रशिक्षकांकडून घेत आहेत रास गरबाचे धडे
Kolhapur's Swapnil Kusale won gold medal rifle category Asian Games
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध
Pune World Cup Rally
पुण्यात ढोल ताशांच्या गजरात वर्ल्डकप रॅलीचं जंगी स्वागत, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, क्रिकेटपटू केदार जाधव सहभागी
Rohit Pawar ICC World Cup 2023
पुण्यात क्रिकेट विश्व चषकाची वाजतगाजत मिरवणूक, ‘सेल्फी’काढण्याचीही संधी, रोहित पवार म्हणाले…

पैजा, बेटिंग तेजीत

भारतीय संघाने विजय मिळवावा अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यासाठी मोठ्या पैजा लागल्या आहेत. तर कोणता संघ जिंकणार यासाठी बेटिंग तेजीत असून खिशाला कात्री लावण्याचे कामही सुरु असून भारतीय संघ जिंकण्याकडे कल दिसत आहे.

हेही वाचा : पुन्हा खासदार होण्यासाठी शेट्टी कारखानदारांना लक्ष्य करून पोळी भाजत आहेत – रामचंद्र डांगे

निळाईची झाक

भारतीय क्रिकेट संघाचा गणवेश असलेल्या निळ्या जर्सीचा दरही वधारला आहे. २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतची जर्सी घेण्यासाठी तरुणाईची गर्दी होत आहे. अनेक क्रिकेट संघ, तालीम संघ, तरुण मंडळ यांनी अंतिम सामना प्रोजेक्टरद्वारे मोठ्या पडद्यावर एकत्रित पाहण्याची जय्यत तयारी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur preparations for icc world cup final match india vs australia css

First published on: 18-11-2023 at 21:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×