कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या उमेदवारीला शनिवारपासून सुरुवात झाली. यामुळे जिल्हा काँग्रेस भवन गर्दीने फुलले होते. उमेदवार मुलाखतीला जात असताना समर्थकांची घोषणाबाजी होत होती. निवडून येण्याची क्षमता, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी असलेले संबंध, लोकोपयोगी कामे याचा विचार करून उमेदवारी निश्चित करण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसकडून घेतला जाणार असल्याचे लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांनी सांगितले. त्यांच्यासह निरीक्षक म्हणून आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास नाथ उपस्थित होते.

आजचे मतदारसंघ आणि इच्छुक याप्रमाणे – कोल्हापूर दक्षिण – आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगले – आमदार राजू आवळे, टी. एस. कांबळे, शिरोळ – गणपतराव पाटील, करवीर – राहुल पाटील, कॅप्टन उत्तम पाटील, राधानगरी – राजेंद्र मोरे, सचिन घोरपडे, जीवन पाटील, चंदगड – गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, विद्याधर गुरंबे, प्रा. किसन कुराडे, सोमनाथ आरबळे, प्रा. किसन कुराडे, कागल – सागर कोंडेकर, दिग्विजय कुराडे

हेही वाचा: इचलकरंजीत ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूरसाठी रांग

कोल्हापूर उत्तर -आमदार जयश्री जाधव, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, वसंतराव मुळीक, राजू लाटकर, आर. डी. पाटील, आनंद माने, दुर्वास कदम इचलकरंजी – संजय कांबळे, राहुल खंजीरे, स्मिता संजय तेलनाडे. शाहूवाडी – अमर पाटील, सुभाष इनामदार यांनी मुलाखती दिल्या.